पोलीस असलेली पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासामुळे पतीची आत्महत्या !
प्रतिनिधी —
पोलीस असलेल्या पत्नीचे असलेले प्रेमसंबध गावात कळाल्याने बदनामी झाली. तसेच पत्नी व तिच्या प्रियकराने वेळोवेळी दिलेल्या त्रासामुळे अकोले तालुक्यातील निंब्रळ येथील २८ वर्षिय तरुणाने घराच्या पडवीत लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून याबाबत तरुणाच्या वडिलांनी फिर्याद दिल्याने पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकरासह चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दाखल केला आहे.

पत्नी करुणा अमोल वाकचाैरे (ह.मु.पोलिस मुख्यालय, कळंबोली, मुंबई) तिचा प्रियकर योगेश गोसावी, संकेत राधाकिसन सोनवणे, प्रतिभा राधाकिसन सोनवणे अशी आरोपींची नावे आहेत.

मयत तरुणाचे वडिल कैलास विठ्ठल वाकचाैरे ( रा.निंब्रळ, ता.अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, मुलगा अमोल कैलास वाकचाैरे याने गावातीलच करुणा राधाकिसन सोनवणे (ह.मु.पोलिस मुख्यालय कळंबोली, मुंबई) हिच्याबरोबर सन २०१८ मध्ये प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर दोघे मुंबई येथे राहावयास गेले होते. त्यानंतर दोघात वाद होऊ लागल्याने मुलगा दोन वर्षापासून गावी निंब्रळ येथे राहत होता.

त्यास कारण विचारले असता त्याने सांगितले कि, त्याची पत्नी करुणा अमोल वाकचाैरे हिचे योगेश गोसावी ( मु.रा.नादगाव, जि.नाशिक) याचे बरोबर अनैतिक संबंध असल्याचे मला माहित झाल्याने वाद झाले व पत्नी करुणा व तिची आई प्रतिभा सोनवणे यांनी मला मारहाण करुन मुंबई येथून घराबाहेर काढून दिले होते.

त्यानंतर आम्ही सुन करुणा हिच्या मामाच्या घरी बैठक घेऊन करुणा हिस नांदावयास येण्या बाबत विनवणी केली होती. दोन महिन्यांपासून सुन करुणा ही पती अमोल यास वारंवार फोन करुन मला तुझ्याबरोबर राहायचे नाही. तु माझ्या लायकीचा नाही. असा त्रास देत होती. तसेच पत्नी करुणा माहेरी निंब्रळ गावात आली असता घरी येत नसे. तसेच तिचा प्रियकर योगेश गोसावी बाबत असलेल्या अनैतिक संबंधांची गावात माहिती होऊन आपली बदनामी झाल्याच्या भावनेने मुलगा मानसिक तणावाने झुरत होता.

त्यात दोन दिवसांपूर्वी करुणा ही माहेरी निब्रळ येथे आलेली असताना मुलगा अमोल व पत्नी करुणा यांचे फोनवर संभाषण होऊन परत भांडण झाले होते. एकूणच सुन करुणा व योगेश गोसावी यांचे प्रेमसंबंध संपूर्ण गावाला समजल्यामुळे तसेच सुन करुणा हिने दिलेल्या माणसिक त्रासामुळे मुलगा अमोल याने एक नोव्हेंबर शनिवार २०२२ रोजी रात्री ९ वाजवण्याच्या सुमारास घराजवळ शेडच्या लोखंडी पाईपला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुलाची पत्नी करुणा अमोल वाकचाैरे, तिचा प्रियकर योगेश गोसावी, संकेत राधाकिसन सोनवणे, प्रतिभा राधाकिसन सोनवणे यांनी मुलाला आत्महत्या करण्या प्रवृत्त केले असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. अकोले पोलिस स्टेशनला वरील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हंडोरे हे करीत आहेत.

