संगमनेरात जुगार अड्ड्यावर छापा !

११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ;  साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी —

गांधी जयंतीच्या पहाटेच संगमनेर शहर पोलिसांनी शहरातील जुन्या पुणे नाशिक महामार्ग वर असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा घालून ११ जणां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेर शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची मालिका जुगार अड्ड्या पर्यंत येऊन पोहोचली आहे. अवैध गोवंश कत्तलखान्यांबरोबरच, मटका, गांजा विक्री आणि गुटख्यासह जुगाराची संगमनेर मध्ये चलती असल्याचे उघड झाले आहे.

संगमनेर शहरांतर्गत असणाऱ्या पुणे नाशिक रोडवर लकी हॉटेल शेजारील पांढऱ्या रंगाच्या बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या हॉलमध्ये संगमनेर पोलिसांनी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास छापा घालून अकरा जुगाऱ्यां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आकाश अर्जुन गोडगे (रा. इंदिरानगर, गल्ली नंबर २) शुभम हिरामण शिंदे, सचिन बंडू मंडलिक (रा. खांडगाव, ता. संगमनेर) गणेश बारकू धामणे (रा. इंदिरानगर, संगमनेर) प्रवीण सहदेव जगदाळे (रा. गोल्डन सिटी, संगमनेर) निलेश अशोक काळे (रा. कोल्हेवाडी रोड, संगमनेर) रवींद्र देवराम मस्के (रा. मालदार रोड, संगमनेर) प्रतीक जुगलकिशोर जाजू (रा. गणेशनगर, संगमनेर) दीपक सुभाष फटांगरे (रा. गणेशनगर, संगमनेर) राहुल सुरेश शिंदे (रा. शिवाजीनगर, संगमनेर) आणि सनी गोरख पवार (रा. मालदार रोड, संगमनेर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ५ लाख ४७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामध्ये १ लाख २१ हजार ५०० रुपये रोख रक्कम, ३ लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार क्रमांक एमएच १७ एझेड ०३००, ३० हजार रुपये किमतीची पॅशन मोटार सायकल क्रमांक एमएच १७ एए ८०५२, ६ हजार रुपये किमतीची कावासाकी मोटरसायकल क्रमांक एमएच १५ एक्स ४३८८, ३० हजार रुपये किमतीची पॅशन मोटर सायकल क्रमांक एमएच १७ बीएच ५७२ ६० हजार रुपये किमतीची पल्सर मोटार सायकल क्रमांक एमएच १७ बी इ ६८४३ अशी जप्त केलेल्या मुद्देमालाची यादी आहे.

पोलीस नाईक यमना नामदेव जाधव, संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हे करत आहेत.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!