संगमनेरात कत्तलखान्यांवर छापे !
सहाशे किलो गोमांस व इनोव्हा कार जप्त
प्रतिनिधी —
ईद-ए-मिलाद आणि कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर पोलिसांनी संगमनेरातल्या कु-प्रसिद्ध अवैध कत्तलखान्यांमध्ये छापे घालून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ६०० किलो गोवंश मांस व एक इनोवा कार जप्त करण्यात आले आहेत.

अवैध धंद्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या संगमनेर शहरात पोलिसांनी कारवाई करत शहरातील मदिनानगर येथे पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल केलेले गोवंश मांस व दोघा जणांना पकडले आहे. आयाज हबीब कुरेशी (रा. मदिना नगर, संगमनेर) आणि साद मुस्ताक कुरेशी हा फरार झाला आहे.

तसेच पहाटे मौलाना आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागे छापा टाकून साहिल मुस्ताक कुरेशी (रा. सहारा कॉलनी) यास ताब्यात घेतले आहे.
दोन्ही ठिकाणाहून पोलिसांनी सुमारे ६०० किलो गोवंश मांस जप्त केले आहे. तसेच गोमांस वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी सिल्वर रंगाची इनोव्हा गाडी क्रमांक एम एच ०३ झेड ६७३१ ही देखील ताब्यात घेण्यात आली आहे.

संगमनेर शहरातील अवैध धंद्यांवर संगमनेर टाइम्सने प्रकाश टाकल्यानंतर पोलीस पुन्हा कारवाई च्या मूडमध्ये आले आहेत. मात्र हे अवयव धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. हे या घटनांवरून उघड होत आहे.

