जहागीरदारवाडा येथे मिलन मटका टपरीवर पोलिसांचा छापा

शहर पोलिसांची लुटुपुटू ची कारवाई ; मटका किंग मात्र मोकळेच !

प्रतिनिधी —

सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांसाठी कू – प्रसिद्ध असलेल्या संगमनेर शहरात पोलिसांनी लुटुपुटूच्या कारवाया सुरू केल्या आहेत. माध्यमांना व वरिष्ठांना दाखवण्यासाठी या किरकोळ कारवाया सुरू असून अवैध धंद्या मधले “बडे किंग” मात्र मोकळेच आहेत.

सर्व प्रकारच्या अवैध धंद्यासाठी संगमनेर शहर प्रसिद्ध असून या धंद्यांना पोलिसांचे आशीर्वाद असल्याचे वृत्त संगमनेर टाइम्सने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर दोनच दिवसात पोलिसांनी आपल्या दिखाव्याच्या लुटुपुटू कारवाया सुरू केल्या.

नगर जिल्ह्यात “मटका हब” असणारे संगमनेर शहर हे सर्वश्रुत आहे. अशा मटका हब शहरात सर्व चौकाचौकांमध्ये आणि टपऱ्यांमध्ये मटका राज रोसपणे सुरू आहे. तीन-तीन मटका किंग शहरात कार्यरत आहेत. असे असताना शहर पोलिसांनी कारवाई केले हे दाखवण्यासाठी शहरातील जहागीरदार वाडा, दिल्ली नाका येथे छापा टाकून या ठिकाणी एका छोट्या टपरीमागे मिलन मटका चालवणाऱ्या पंटर” वर कारवाई केली आहे.
रियाज अब्बास पठाण ( रा. सुकेवाडी रोड, विजयनगर, संगमनेर) याला अटक करण्यात आले आहे.

या ठिकाणी पोलिसांनी शून्य किमतीचे लाल पांढऱ्या रंगाचे पुस्तक त्यावर बॉल पेनने लिहिलेले आकडे तसेच २ हजार रुपये रोख जप्त केले आहेत.

संगमनेर शहरात सुरू असणाऱ्यां अवैध धंद्यांमध्ये मटका हा पूर्वापार सर्वात मोठा अवैध धंदा आहे. या अवैध धंद्यांचे “किंग” संगमनेर मध्ये राजरोस पणे बेकायदेशीर व्यवसाय करत आहेत. शहरातील विविध चौकांमध्ये मटक्याच्या टपऱ्या सर्रासपणे सुरू आहेत.

या टपऱ्यांवर आकडे घेतले जातात. पोलिसांना हप्ते मिळतात. परंतु कुठलीही कारवाई होत नाही. या मटक्याची प्रसिद्धी संपूर्ण नगर जिल्ह्यात आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने शहरात छापे टाकून मोठमोठ्या कारवाया केल्या आहेत. मात्र संगमनेर शहर पोलिसांना मटका किंग सापडत नाही हे न उघडणारे कोडे आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!