दुर्गावाहिनी…. विहिंप…बजरंग दल…गणेश विसर्जनाचे सेवेकरी !
प्रतिनिधी —
धार्मिक कार्यासह सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गावाहिनीच्या युवक – युवती, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी याही वर्षी तेवढ्याच उत्साहाने गणेश विसर्जनाच्या व गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपले सेवाभावी कार्य पार पाडले.
सालाबादाप्रमाणे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गावाहिनीच्या सेवेकर्यांनी संगमनेर शहरवासीयांच्या गणेश विसर्जनासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि दुर्गावाहिनीचे संगमनेर शहरातील नागरिकांनी आभार व्यक्त केले असून कौतुक केले आहे.

प्रवरानदी पात्रात गणेश विसर्जना साठी येणाऱ्या नागरिकांना, महिलांना, लहान मुलांना त्रास होऊ नये म्हणून बजरंग दलाच्या वतीने “तराफा” तयार करून बजरंग दलाचे कार्यकर्ते गणेश मूर्ती थेट प्रवरा नदीच्या मध्यावर नेऊन पाण्यात विसर्जित करण्याचा उपक्रम बऱ्याच वर्षापासून सातत्याने करत आहेत. याही वर्षी त्यांनी अत्यंत उत्साहात गणेश मूर्ती विसर्जनाचे कार्य पार पाडले.

गणेश विसर्जनाच्या या पद्धतीमुळे गणेश मूर्तींची कुठलीही विटंबना न होता यथोचित गणेश विसर्जन होत आहे. त्याचबरोबर दुर्गावाहिनीच्या युवतींनी निर्माल्य, पर्यावरण जागृती आणि परिसर स्वच्छतेचे काम तेवढ्याच तन्मयतेने केले. या सर्व कार्याबद्दल प्रशासनासह संगमनेरच्या नागरिकांनी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गावाहिनीच्या सेवेकऱ्यांचे कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले असून त्यांचे कौतुक देखील केले आहे.

विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी शहर संयोजिका गुंजन ज्ञानेश्वर कर्पे, कादंबरी बेल्हेकर, धनश्री राठी, आर्या बेल्हेकर, प्रेरणा कोदे, मयुरी अखाडे, समृद्धी बारड व इतर दुर्गा उपस्थित होत्या. तसेच बजरंग दलाचे गोपाल राठी, सचिन कानकाटे, संदीप वारे, विशाल वाकचौरे, कुलदिप ठाकूर, अश्विन बेल्हेकर, शुभम कपिले, प्रशांत बेल्हेकर, आशिष ओझा, गणेश भोईर, आकाश राठी, राजेंद्र महाजन, वाल्मिक धात्रक, रमेश शहरकर, राजेंद्र महाजन, गिरीष सोमाणी, श्याम नाईकवाडी, जितू तिवारी, अमित कुलकर्णी, अजिंक्य डोंगरे, रवी मंडलिक, मंगेश बुळकुंडे, ऋषिकेश पवार, हरिष शिंदे, राहुल पडदुणे आदी उपस्थित होते.


