संगमनेर मधल्या सामाजिक संघटनांनी विसर्जनाच्या दिवशी पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेचा ध्यास घेऊन केले सेवाभावी काम !

 प्रतिनिधी —

 

“अनंत चतुर्दशी” च्या दिवशी विसर्जनाच्या निमित्ताने होणारे प्रदूषण होऊ नये म्हणून  संगमनेर नगरपरिषद, एकविरा फाउंडेशन, युवा महेश, गो-ग्रीन, संगमनेर विधी महाविद्यालय, निर्मल ग्रुप, लायन्स क्लब ऑफ संगमनेर, मालपाणी उद्योग समुह, लायन्स क्लब ऑफ सफायर, इनर्व्हील क्लब संगमनेर, रोटरी क्लब ऑफ संगमनेर,अमृत उद्योग समूह, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी, महसूल प्रशासन, पोलीस दल यांच्या वतीने शहरातील नागरीकांनी गणपती विसर्जनासाठी आणलेले निर्माल्य एकत्र गोळा करुन त्याचे वर्गीकरण केले. तसेच मुर्तीचे संकलन करून विधीवत विसर्जन केले. आता निर्माल्या पासून संगमनेर नगरपरिषदेच्या अंतर्गत सेंन्द्रिय पध्दतीने खत बनविणार आहे. 

“अनंत चतुर्दशी” दिवशी कार्यकर्ते सकाळ पासुन न थकता, उत्साहाने हे काम करत होते.

एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरातील युवक – युवतींनी एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रवरानदी काठी निर्माल्य गोळा करुन साफसफाई करत गणेश विसर्जनात सेवाभावी काम केले.

 

गणेश उत्सवानिमित्त संगमनेर शहरातील अनेक मानाचे व इतर गणपती, घरगुती गणपती प्रवरा नदीकाठी विसर्जित करण्यासाठी आलेले असतात. एकविरा युवक – युवती फाउंडेशनच्या वतीने नदीकाठी साफ सफाई अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत प्रवरा नदीकाठी असलेल्या गंगामाई घाटाच्या ठिकाणी, म्हाळूंगी नदीच्या काठी गणेश विसर्जन करण्यात येणाऱ्या विविध ठिकाणी या युवक – युवतींनी निर्माल्य गोळा केले.  यामध्ये ३०० युवक – युवतींनी सहभाग घेतला.  ५० – ५० च्या गटाच्या युवतींनी वेगळ्या ठिकाणी उभे राहून हे निर्माल्य गोळा केले. येणाऱ्या भाविकांना प्रवरेच्या पुराची माहिती सांगून आपण सर्व निर्माल्य एका ठिकाणी गोळा करावे. तसेच गणेश विसर्जन सुद्धा नगर परिषदेने केलेल्या तळ्यामध्ये करावे यासाठी सुद्धा विनंती केली. यामुळे अनेक शहरातील नागरिकांची सोय झाली.

त्याचबरोबर शहरातील विविध सामाजिक संघटनांनी देखील हाच उपक्रम राबवत संगमनेरच्या पर्यावरणाला संरक्षण देत स्वच्छता मोहीम राबवली.

 

डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, कोरोनाच्या दोन वर्ष संघटनानंतर यावर्षी सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे .आपण गेली दहा दिवस गणेश उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला. आज गणपती बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाला दुःख होत आहे. परंतु ही परंपरा आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जन आपण करत असतो. त्यानुसार प्रवराकाठी असलेल्या तळ्यांमध्ये अनेकांनी गणेश विसर्जन केले.शहरातील विविध नागरिकांनी आलेल्या गणेशाच्या निर्माल्याचे आम्ही कोरडे निर्माल्य व ओले निर्मले असे वेगळे करून एकत्रित केले व त्याची विल्हेवाट लावली.

अनंत चतुर्थीच्या दिवशी युवतींनी पुढाकार घेत निर्माल्य गोळा केल्याने मलाही खूप आनंद झाला. समाजामध्ये अस्वच्छतेमुळे अनेक रोगांचा फैलाव होत असून स्वच्छता हाच चांगल्या आरोग्यासाठी मोठा मूलमंत्र असल्याचेही डॉ. जयश्री थोरात यांनी सांगितले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शहरातील नागरिकांनी अतिशत शांततेत व उत्साहात गणेश विसर्जनाची मिरवणूक काढल्या यावेळी ढोल ताशा चा गजर व तरुणाईचा जल्लोष यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला. गणेश विसर्जन व निर्माल्य एकत्र गोळा करुन प्रवरा नदीकाठ स्वच्छ ठेवणे कामी व विविध युवा संघटनांनी यासाठी पुढाकार कौतुकास्पद असून सर्व नागरिकांचे व नगरपालिकेचे कौतुक केले आहे. प्रांत अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी संगमनेर वासीयांचे आणि सर्व गणेशोत्सव मंडळांचे आभार व्यक्त केले आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!