भाजप म्हणजे पोकळ घोषणा आणि जाहिरातबाजी — अनुराधा नागवडे

संगमनेर मध्ये महिला मेळावा संपन्न

प्रतिनिधी —

केंद्र व राज्य राज्यातील भाजपाच्या सरकारला सर्वसामान्यांचे कोणतेही घेणे देणे नाही. या सरकारने गोरगरीब महिला आदिवासी व शेतकऱ्यांची मोठी उपेक्षा केली असून न केलेल्या कामांच्या श्रेयाबरोबरच फक्त पोकळ घोषणा आणि जाहिरातबाजी करत असल्याची टीका काँग्रेस महिला नेत्या अनुराधा नागवडे यांनी केली आहे.

अहमदनगर जिल्हा बँकेच्या संगमनेर शाखेतील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी सभागृहात महिला काँग्रेस व जयहिंद महिला मंचावतीने आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी तालुकाध्यक्ष अर्चना बालोडे, पद्माताई थोरात, शालन गुंजाळ, सविता खताळ, सुनीता अभंग, नयना राहणे, दिपाली वर्पे, सुनंदाताई दिघे, सुहासिनी गुंजाळ, ज्योती दारोळे, सुनीता कांदळकर, सौदामिनी कान्होरे सुनीता खताळ आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अनुराधा नागवडे म्हणाल्या की, संगमनेर तालुक्यामध्ये कांचन थोरात व दुर्गा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गटाचे सक्षम जाळे आहे .काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी शाश्वत विकासाच्या योजना राबवल्या असून त्यांनी कोणत्याही कामाची कधीही प्रसिद्धी केली नाही.

राज्यात व देशात महत्त्वाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी सातत्याने सर्वसामान्य जनतेला न्याय दिला आहे. निळवंडे धरणाचे कालवे त्यांनीच मार्गी लावले आहे. आज संगमनेर हे राज्यात प्रगतीशील शहर आहे. सुरक्षित शहर आहे. याउलट जे काम करत नाही ते भाजपचे लोक जाहिरात बाजी व पोकळ घोषणा करत आहेत.

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने महिलांची सातत्याने उपेक्षा केली आहे. कोणतेही ठोस निर्णय घेतलेले नाहीत. जुन्या योजनांची नावे बदलली. एवढाच त्यांचा कार्यक्रम सुरू आहे. 2024 मध्ये देशात नक्की परिवर्तन होणार असून काँग्रेसची सत्ता येणार आहे. यामध्ये महिलांची मोठी भूमिका असणार असून सर्व महिला भगिनींनी देशाची एकात्मता अखंडता टिकवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा विचार घरोघरी पोहोचवावा असे आवाहन त्यांनी केले.

अर्चना बालोडे म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला आहे. संगमनेर तालुका हा महिलांसाठी अत्यंत सुरक्षित व सन्मान करणार आहे. आर्थिक प्रगती व समृद्धी हे या तालुक्याचे वैशिष्ट्य असून सर्व महिला भगिनींनी काँग्रेसचा विचार अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विविध महिलांनी आपले मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता कांदळकर यांनी केले तर सौदामिनी कान्होरे यांनी आभार मानले

काँग्रेसने मोठे केले ते आता भाजपचे गुणगान गात आहेत

काँग्रेस पक्षाने मोठ-मोठी पदे दिली. त्यांना मानसन्मान काँग्रेस पक्षामुळे मिळाला. मात्र सत्तेसाठी त्यांनी पक्ष बदलले असून तीन वर्षांपूर्वी जय हो म्हणणारे आता काँग्रेसवर टीका करत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्यांच्या पाठीमागे जनता नसून पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या आमदार थोरात यांच्या पाठीशी तालुक्यासह जिल्ह्यातील जनता असल्याचे पठार भागातील महिला भाग्यश्री नरवडे यांनी म्हटले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!