जुगार अड्ड्यावर LCB चा छापा !
२० जणांवर गुन्हा ; ४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या ‘तिरट’ जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत १९ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, जुगारासाठी जागा उपलब्ध करून देणारा शाहीद सादिक शेख फरार आहे. एकूण २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ९१ हजार ६२० रुपये रोख व १५ मोबाईल असा एकूण ४ लाख ७५ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निपाणी वडगाव, (ता. श्रीरामपूर, अहिल्यानगर) येथे करण्यात आली.
ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये लक्ष्मण कान्हु दासरयोगी, राजेंद्र गंगाधर मापारी, ईर्शाद अलि शेख, सतीष आप्पासाहेब शेळके, हसन युनूस शहा, रवी विठ्ठल हतांगळे, सद्दाम शफी शेख, दत्तात्रय भाऊसाहेब उंडे, बबलू शफी शेख, वसीम मुक्तार शेख, आकाश सुरेश लोखंडे, विकी दुर्गा दासरयोगी, संतोष रामभाऊ राशीनकर, प्रतीक बाबासाहेब हिवाळे, राजू शब्बीर शेख, गोकुळ आसाराम तागड, आप्पासाहेब लक्ष्मण विखे, मच्छिंद्र गोरख मापारी आणि विकास चंदन लोखंडे यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान सदर जुगाराचा व्यवसाय शाहीद सादिक शेख, रा. वॉर्ड नं. २, श्रीरामपूर याचा असून तो जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याची माहिती मिळाली. तो सध्या फरार आहे.
या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ८८३/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे करीत आहे.
