काँग्रेस पक्षावर मोठे झालेल्या विखेंनी काँग्रेसची काळजी करू नये — कानवडे

संगमनेरमध्ये ढवळाढवळ करण्यापेक्षा शिर्डीमध्ये लक्ष द्यावे

प्रतिनिधी —

काँग्रेस पक्ष हा गोरगरिबांच्या विकासाचा विचार आहे. याच विकासाच्या विचारांवर देशाने ७० वर्षात मोठी प्रगती साधली असून हाच विचार घेऊन विखेही मोठे झाले आहेत. मात्र  त्यांनी पक्षाला अडचणीत आणून पक्षांतर केले असल्याने त्यांनी आता काँग्रेस पक्षाची काळजी करू नये. तसेच संगमनेर संगमनेर तालुक्यात ढवळाढवळ करण्यापेक्षा शिर्डी मतदार संघातील जनतेची काळजी घ्यावी असे रोखठोक प्रतिक्रिया काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे यांनी केले आहे.

मिलिंद कानवडे यांनी पत्रकारांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका विकास कामांमुळे सर्व क्षेत्रात प्रगतीवर आहे. किंबहुना विकासाचा मापदंड म्हणून संगमनेरकडे पाहिले जाते. हे त्यांना पहावत नाही. राहाता मतदार संघात विकासाची अवस्था वाईट आहे. तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रांची वाईट अवस्था आहे. सर्वच बाबतीत शिर्डी मतदारसंघ हा पिछाडीवर पडलेला असताना तेथील जनतेला वेळ देऊन त्यांचे प्रश्न सोडवण्या ऐवजी फक्त राजकारण म्हणून आमदार विखे हे संगमनेर मतदार संघात विनाकारण ढवळाढवळ करत आहेत.

खरे तर त्यांनी असे न करता शिर्डी मतदार संघातच थांबले पाहिजे. केंद्रात व राज्यात आता भाजपाची सत्ता आहे. तो मतदार संघ प्रगतशील बनवण्यासाठी काम केले पाहिजे. मात्र बातम्यांचे मथळे करण्यासाठी ते विविध तालुक्यांमध्ये जाऊन हस्तक्षेप करत आहेत.

संगमनेर तालुका हा शाश्वत विकासाचा आहे. येथील जनता आमदार थोरात यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. त्यामुळे समाजात भेदभाव करण्याची कुटनिती त्यांनी करू नये. तसेच ज्या काँग्रेस पक्षाच्या बळावर आपण मोठे झालो आहोत त्या काँग्रेस पक्षाबाबत आता त्यांना बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यांनी आहे तेथे सुखी राहावे. असेही मिलिंद कानवडे यांनी म्हटले असून भाजपमध्ये आता ते चौथ्या लाईनला बसतात. यावरून त्यांची अवस्था संपूर्ण महाराष्ट्राला व शिर्डीतील जनतेलाही कळत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!