अंतर्मनाच्या शुध्दीसाठी निरंतर योग साधना आवश्यक —

डॉ. संजय मालपाणी

संगमनेर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी — 

 

विद्यार्थी जीवनामध्ये आत्मविश्वास वाढीसाठी व अंतर्मनाच्या शुध्दीक्रीयेसाठी योग अनिवार्य असून सर्व विद्यार्थी तसेच प्रत्येकाने निरंतर योगसाधना करणे आवश्यक आहे. योग साधनेमुळे उत्तुंग आत्मविश्वास निर्माण होऊन यश प्राप्त करता येते असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष तसेच राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सोमनाथ सातपुते, संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, राहुल देशमुख, डॉ. भालचंद्र भावे, प्राचार्या सविता घुले, श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेंद्र ढमक, डॉ. ललित बिहारी जोशी आदी उपस्थित होते.

योगाच्या जागतिक व राष्ट्रीय प्रचारासाठी व खेलो इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये योगा हा खेळ म्हणून समाविष्ट व्हावा. तसेच ऑलंपिकमध्येही त्याला स्थान मिळावे यासाठी निरंतर प्रयत्न सुरु आहेत. तसेच शालेय अभ्यासक्रमात योग विषयाचा समावेश करण्यासाठी प्रयत्नशील असून, योग या विषयाच्या माध्यमातून आपल्या देशातच नव्हेतर तर युरोपीयन देशांमध्ये देखील रोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात प्राप्त होत आहेत असे त्यांनी सांगितले.  नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धामध्ये ध्रुव ग्लोबल स्कुल टीमच्या योगपटुंना सहा सुवर्ण, चार रौप्य व एक ब्राँझ मेडल प्राप्त झालेले आहे.  तसेच संगमनेर महाविद्यालयाच्या वैष्णव कोरडे या विद्यार्थ्यानेही खेलो इंडिया स्पर्धेमध्ये उत्तुंग यश प्राप्त केले आहे.  विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संगमनेर तालुक्याचे नाव देशाच्या नकाशात कोरले गेले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

या सर्व विजेत्या स्पर्धकांचे संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले व मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान केला.

आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने डॉ. राजेंद्र वामन यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर सहकारी, संगमनेर शहरातील पत्रकार, ज्येष्ठ नागरिक यांनी योगसाधना व प्रात्यक्षिके केली.

याप्रसंगी खेलो इंडिया स्पर्धेतील ग्लोबल स्कूलच्या विजेत्या संघाने व संगमनेर महाविद्यालयाच्या संघाने अद्भूत अशी योग प्रात्यक्षिके सादर केली.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र वामन यांनी केले  सुत्रसंचालन डॉ. जितेंद पाटील यांनी तर प्रार्थना डॉ. अनिरुद्ध मंडलिक यांनी म्हटली. उपप्राचार्य  डॉ. राजेंद्र ढमक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक संस्थेच्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी, प्राध्यापक, सहकारी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. आप्पासाहेब गुंजाळ, एनसीसी सीटीओ डॉ. नरेंद फटांगरे, लेफटनंट हेमलता तारे, डॉ. अजितकुमार कदम, प्रा.  प्रविण गुंजाळ, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन कदम, प्रा. सचिन पठारे, प्रा. उगले, संजय काशिद, आण्णा पठाडे, ऋषीकेश थोरात, संतोष कुदळ आदींनी परिश्रम घेतले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!