कळसेश्वर विद्यालयाने गाठला कळस !
दहावीचा शंभर टक्के निकाल
प्रतिनिधी —
अकोले तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेले गाव म्हणजेच कळस बु गावाच्या नावाप्रमाणेच यंदा शैक्षणिक क्षेत्रात दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेने यशाचा कळस केला आहे. यंदा कळसेश्वर विद्यालयाने शे १०० टक्के निकाल घेऊन उज्वल गुणवत्तेची साद घातलेली आहे.
दोन वर्षे कोरोनाच्या काळात देखील शिक्षकांचे शिकविण्याचे प्रामाणिक प्रयत्न आणि विद्यार्थांचे प्रामाणिक पराकाष्ठा याचे फलित म्हणुन विद्यालयाचा निकाल हा उच्चांकी निकाल लागला आहे. विद्यालयातील विद्यार्थीनी पायल संजय वाकचौरे हिने सर्वात जास्त ९७.६०% गुण मिळवले आहेत.
तसेच वैष्णवी भानुदास चौधरी, वैष्णवी विष्णु वाकचौरे, आदिती गोपीनाथ ढगे, कार्तिक शशिकांत कातोरे यांनी ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

तालुक्यात विद्यालयाचा तसेच कळस गावचे नावलौकिक मिळवुन विद्यार्थांनी आपल्या कष्टांना यशाचा पैलतीर मिळवुन दिला आहे. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शेलार व त्यांच्या सर्व शिक्षक टिम चे या यशाबद्दल कौतुक सर्वस्तरावरून केले जात आहे. जिल्हा परिषदेचे अर्थ बांधकाम सभापती कैलास वाकचौरे तसेच अगस्ती शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी दुर्गाबाई नाईकवाडी, अध्यक्ष शैलजा पोखरकर, कार्याध्यक्ष सतिश नाईकवाडी तसेच कळस बु ग्रामपंचायत, सोसायटी व सर्व संस्था,ग्रामस्थ,पालक यांनी विशेष कौतुक विद्यार्थांच केले आहे.
