माळशेज घाटाच्या दरीत उडी मारून एसटी कंडक्टरची आत्महत्या

प्रतिनिधी — 

एसटीच्या प्रदीर्घ संपानंतर महाराष्ट्रातील बस वाहतूक सुरळीत झाली असताना आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या असतानाच आता अकोले एसटी आगारातील एका बस कंडक्टरने माळशेज घाटातील दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

गणपत मारुती इदे ( वय ४४ रा.भंडारदरा) असे मयत कलेक्टर चे नाव असून ते अकोले एस.टी.डेपोचे वाहक या पदावर काम करत होते.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, अकोलेच्या एस.टी.डेपोत वाहक (कंडंक्टर) म्हणून कार्यरत असलेले गणपत मारुती इदे हे काल अकोले कल्याण बस घेऊन गेले होते. कल्याणला मुक्कामी असताना ते रात्री घरी येऊन परत ड्युटी ला जात असताना माळशेज घाट येथे रस्त्याचे काम चालु असल्याने ट्राफिक जाम असल्याने गाडी थांबली असताना गाडीतून उतरून दरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली हे अद्याप कळालेले नाही. मात्र ड्यूटीवर ताण तणाव होता का? कि घरगुती तणावात होता यावर चर्चा सुरु आहे.

आर्थिक अडचणींमुळे कंडक्टर इदे यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा आहे . मागील महिन्यात  त्यांना अवघा ६ हजार रुपये पगार मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे.

कोविड संकटकाळ व नंतर संपाचा कालावधी संपुन नुकतेच महामंडळ व कर्मचारी कामावर रूजू झालेले होते. अश्या काळातच वाहकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. संप काळात वाहक – चालकांची आर्थिक स्थिती बिघडलेली होती. नुकतीच संपकाळानंतर एस.टी.महामंडळ व कर्मचारी रूळावर येत आहे.

कंडक्टर इदे हे भंडारदारा येथील रहिवासी असून ते अकोले डेपो मध्ये कामावर कार्यरत होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!