आमदार विखे पाटलांनी जाहीर केलेली आकडेवारी एवढी बोचली काॽ — शिंदे

जोर्वे गावच्या रस्त्यांना देखील आमदार विखे पाटलांनी निधी दिला आहे.

विखे – थोरात समर्थकांचा कलगीतुरा सुरू

 

प्रतिनिधी —

 

संगमनेर तालुक्यासाठी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या निधीबाबत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केलेली आकडेवारी एवढी बोचली का ॽ असा सवाल भाजयुमोचे सचिव सचिन शिंदे यांनी केला आहे.

संगमनेर येथील एका कार्यक्रमात भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केंद्राच्या निधीवरून जोरदार टीका केली होती. या टीकेला थोरात समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश थोरात यांनी प्रतिउत्तर दिले होते. आता थोरात – विखे समर्थकांमध्ये यावरून पुन्हा वाद-प्रतिवाद सुरू झाला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या बुथ प्रमुखांच्या बैठकीत भाजपा नेते विखे पाटील यांनी केंद्र सरकारने संगमनेर तालुक्यात उपलब्ध करून दिलेल्या निधीची माहीती दिल्यानंतर सुरेश थोरात यांनी केलेल्या टिकेला उतर देताना सचिन शिंदे यांनी सडेतोड उतर देवून वर्षानुवर्षे तेच प्रश्न जनते समोर नैवून सत्तास्थान भोगणारे आता उघडे पडले आहेत. कोव्हीड संकटात कोणतीच मदत जनतेला करू शकले नाहीत. मुंबईत बसून तालुक्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून देणारेच केंद्र सकारने उपलब्ध करून दिलेली लस देण्यासाठी तालुक्याचे नेते किती आणी कसे धावतहोते हे जनता विसरलेली नाही.

शिर्डी विधानसभा मतदार संघात विखे पाटील यांनी किती निधी आणला हे विचारायचा नैतिकही आधिकार सुरेश थोरात यांना नाही. असे ठणकावून सांगताना ज्या जोर्वे गावात जायलाही रस्ते अनेक वर्षांत झाले नव्हते त्यासाठी विखे पाटील यांनी प्रयत्न करून आणलेल्या निधीतूनच रस्त्याचा विकास झाला हे विसरू नका. असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

विकासाच्या नावाखाली माफीया आणि ठेकेदार सांभाळण्याची संस्कृती शिर्डी मतदारसंघाची नाही. त्यांच्या मतदार संघात झालेल्या रस्त्यांचे डांबर तीन दिवसात उखडत नाही. याकडे लक्ष वेधून सचिन शिंदे यांनी म्हणले आहे की, निधी आणण्याच्या बाबतीत विखे पाटलांचा नाद करून सूर्यावर थुकण्याचा प्रयत्न करू नका. जिल्हा परिषदेत अध्यक्ष असताना संगमनेर तालुक्यात मोठा निधी मंजूर करून दिला. तालुक्यातील अनेक गावांना निधी मिळत नाही. आश्या तक्रारी आणि निवेदन घेवून सामान्य माणूस विखे पाटलांचा आधार मागतो. हे देखील लक्षात राहू द्या. लोणीच्या रस्त्यांचा विकास पाहून का होईना त्यांची काॅपी आता तालुक्यात सुरू केली. नाहीतरी इतक्या दिवस नगरकडे जाणारा प्रत्येक प्रवासी आपल्या नेतृत्वाच्या नावाने बोटच मोडत होता. अशा शब्दात सचिन शिंदे यांनी सुरेश थोरात यांचा समाचार घेतला आहे.

केंद्र सरकारने निधी दिला असल्याने मोठे मन करून भाजप सरकारचे आभार मानायला पाहीजे होते. परंतू ती दानत मंत्री बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या समर्थकात नाही. केंद्राच्या निधीची आकडेवारी जाहीर झाल्याने थोरात आणि त्यांच्या बगलबच्चांचे चेहरे उघडे पडले. त्यांची केविलवाणी आवस्था झाल्यानेच नैराश्याच्या भावनेतून सुरेश थोरात यांनी केलेली पत्रकबाजी संगमनेर तालुक्यातील जनतेलाही पटली नसेल आशा शब्दात शिंदे यांनी सुरेश थोरात यांच्या पत्रकाची खिल्ली उडवली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!