विखेंचे प्रत्येक विधान म्हणजे मोठा जोक — थोरात

राहाता तालुक्यासाठी निधी आना मग बोला…

प्रतिनिधी —

महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने गोरगरीब जनतेचा विकासासाठी काम केले आहे. विविध विकास कामांसाठी राज्य सरकार मधून मोठा निधी मिळवला आहे. हे सर्व जनतेला माहिती आहे. नामदार थोरात हे प्रसिद्धी न करता कामे करतात. यामुळे आज संगमनेर तालुका विकासातून राज्यात अग्रगण्य आहे. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रत्येक व्यक्तव्य म्हणजे मोठा जोक असतो. स्वतःच्या मतदारसंघात राहता तालुक्यासाठी आधी निधी आणावा मग बोलावे, असे खरमरीत प्रतिउत्तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे.

भाजपचे आमदार विखे म्हणतात संगमनेर तालुक्यात केंद्राने निधी दिला मग राहता तालुक्यात तुमचे सरकार तुमचा आमदार असताना का निधी दिला नाही. राहता तालुक्यातील प्रगतीत का मागे आहे.नगर मनमाड रस्त्याची खड्ड्यांचा रस्ता म्हणून महाराष्ट्रात ओळख झाली आहे. अगोदर राहाता तालुक्यात निधी आणा तेथील विकास करा मग बोला असा सवाल माजी जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस नेते सुरेश थोरात यांनी विचारला आहे.

भाजप व विखे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना सुरेश थोरात म्हणाले की ,संगमनेर तालुका हा नामदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो. येथील शिक्षण, सहकार, राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक वातावरण हे राज्याला दिशा दर्शक आहे. सातत्याने मिळालेल्या मोठमोठ्या निधीमधून संगमनेरात अत्यंत मोठमोठी कामे होत आहेत. मात्र ही कामे काही मंडळींना पाहवत नाही. ते जर म्हणतात केंद्राने निधी दिला आहे मग तुमच्या तालुक्याला का मिळाला नाही. हा पहिला विचार करा.

चांगल्याला चांगले म्हणले पाहिजे. मात्र संगमनेर मधील काही फुटीर लोकांमुळे बाहेरची मंडळी येथे येऊन लोकांमध्ये मनभेद करू पाहत आहे. विकास कामांमध्ये संगमनेर राज्यात अग्रगण्य आहे. आणि ते यापुढेही राहील. शिर्डी मतदार संघाचे भाजपचे आमदार असून सुद्धा त्यांना केंद्राकडून निधी मिळवता आला नाही कदाचित केंद्राचा त्यांच्यावर विश्वास नसेल.

नामदार बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते असून काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी सर्वांना सोबत घेत विकास केला आहे.संगमनेर तालुक्यातील विकास प्रक्रियेत सर्वांना सामावून घेतले आहे.

मात्र हा विकास शिर्डीच्या नेतृत्वाला अडचणीचा ठरू लागल्याने ते संगमनेर मध्ये येऊन खोटेनाटे व्यक्तव्य करत आहेत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्य हे नैराश्यातून व अस्वस्थ भावनेतून असून मोठा जोक ठरत असल्याचे ही सुरेश थोरात यांनी म्हटले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!