राष्ट्र सेवा दलाच्या कामाचा अभिमान वाटतो —  साथी नितीन वैद्य

प्रतिनिधी —

माझ्या संपूर्ण आयुष्यात राष्ट्र सेवा दलाचे अशा स्वरूपाचं शिबिर पाहिलं नाही अभिमान वाटतो असं काम आणि शिबिराचे आयोजन राष्ट्र सेवा दल संगमनेर केंद्राने केल्याचे प्रतिपादन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष साथी नितीन वैद्य यांनी केले.

राष्ट्र सेवा दल संगमनेर यांनी २५ ते २९ मे या कालावधीत आयोजित केलेल्या बालकुमार व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचा समारोप राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष साथी नितीन वैद्य यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे,अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. समीर लामखडे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी कासरा दुमाला गावचे सरपंच राजेंद्र त्रिभुवन होते.

राष्ट्रसेवादलाच्या संगमनेर केंद्राने आयोजित केलेल्या शिबिराचे कौतुक करताना अशा शिबिरांमधून सेवादल संस्कारक्षम नवी पिढी घडवण्याचं काम करत असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

राष्ट्रसेवा दलाच्या शाखा व संस्कार शिबिर हे राष्ट्रसेवा दल जिवंत असल्याचे प्रतीक आहे. संगमनेर मध्ये असे अभूतपूर्व शिबिर मी यापूर्वी पाहिले नव्हते. असे महाराष्ट्र सेवादलाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक अर्जुन कोकाटे यावेळी म्हणाले.

यावेळी राष्ट्र सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष समीर लामखडे तालुक्याच्या कार्याध्यक्ष डॉ. सुनीता राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अभ्यास मंडळाच्या प्रमुख प्रा. सुवर्णा बेनके यांनी केले पाहुण्यांचे स्वागत परिचय दत्ता ढगे यांनी करून दिला तर आभार छात्रभारतीचे राज्य संघटक अनिकेत घुले यांनी मानले.

कासारा दुमाला तालुका संगमनेर येथील काशेश्वर विद्यालयात निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते झाले होते. पाच दिवस चाललेल्या या शिबिरात ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या शिबिरासाठी अहमदनगर, बीड, नाशिक, मुंबई इत्यादी जिल्ह्यांतून विद्यार्थी सहभागी झाले होते.

शिबिरामध्ये आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, एरोबिक्स, झांज, लेझीम, गाणी, गप्पा गोष्टी, कथाकथन, पथनाट्याचा समावेश होता.

शिबिरामध्ये ज्येष्ठ साहित्यिक प्रा.मा.रा. लामखडे, हिरालाल पगडाल, दत्ता आरोटे, सारंग पांडे, दीपक पावसे अशा अनेक मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. समारोपाच्या दिवशी कासारा दुमाला गावांमधून शिबिरार्थींनी समता रॅली काढली.

समारोप समारंभासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य सिताराम राऊत प्रा. मा रा लामखडे, हिरालाल पगडाल, राजेश आंधळे, बीके गायकवाड, प्राचार्य भाऊसाहेब शिंदे, प्रा. जयसिंग सहाणे, प्रा. उल्हास पाटील, अर्जुन वाळके, सुरेखा उबाळे सेवादलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते दत्ता ढगे, बजरंग जेडगुले छात्रभारती च्या तालुकाध्यक्ष तृप्ती जोर्वेकर, अर्जुन वाळे, सोमेश्वर कोटकर ग्रामस्थ शिबिरार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!