संगमनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा सदैव सन्मान – नामदार थोरात

पाराजी चकोर सहकार चळवळीतील महत्त्वाचे शिलेदार
खळी येथे भव्य शेतकरी मेळावा संपन्न
प्रतिनिधी —
पाण्यासाठी संघर्ष करून तालुक्यात समृद्धी निर्माण करण्यात जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. पाराजी चकोर यांनी पाणी, शिक्षण व सहकारात आयुष्यभर समर्पित भावनेने काम केले असून विकासातून वैभवाकडे जाणाऱ्या संगमनेर तालुक्याने कायम कार्यकर्त्यांचा सन्मान जपला आहे. गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम, नेतृत्वाचा विश्वास आणि जनतेचे प्रेम यामुळे संगमनेरचा राज्यात मोठा सन्मान असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

खळी येथे आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड.माधवराव कानवडे होते. तर व्यासपीठावर महानंदचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, बाबा ओहोळ, डॉ.जयश्री थोरात, लक्ष्मणराव कुटे, सभापती शंकर खेमनर, सुनंदा जोर्वेकर, मीराशेटे, गणपत सांगळे, संपत डोंगरे, संतोष हासे, दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, रामहरी कातोरे, विष्णुपंत रहाटळ, आर.बी.रहाणे, नवनाथ अरगडे, सुभाष सांगळे, भिमाजी राहिंज,नवनाथ आंधळे, सुरेश थोरात आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार अत्यंत चांगले काम करत आहे. अडचणीत असूनही शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे. या सर्व संकट काळानंतर संगमनेर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी सातत्याने मोठा निधी मिळवला आहे. संगमनेर मधील साखर कारखाना, दूध संघ व इतर सहकारी संस्था अत्यंत चांगले काम करत असून यामुळे तालुक्यात आर्थिक समृद्धी निर्माण केली आहे. समान संधी देवून कायम सर्वांचा सन्मान केला आहे. गोरगरीब माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम संगमनेरमध्ये केले जात आहे. प्रामाणिक काम जनतेचे प्रेम व नेतृत्वाचा विश्वास यामुळे आपल्याला कायम यश मिळत आहे. आपण कधीही कुणाचे वाईट केले नाही. विचारांवर निष्ठा ठेवली. अडचणीच्या काळात पक्षाची धुरा सांभाळली. यामुळे पक्षात आणि राज्यात कायम सन्मान मिळतो आहे. हा सन्मान संगमनेर तालुक्यातील जनतेचा आहे.

सहकारातील कार्यकर्त्यांनी या सहकारी संस्था प्रपंच्यासारख्या सांभाळल्या आहेत. या विभागाने कायम आपल्या वर भरभरून प्रेम केले आहे. तालुक्यात सध्या सात लाख लिटर दुधाचे उत्पादन होत असून यामुळे ग्रामीण अर्थकारण मजबूत झाले आहे. मागील अडीच वर्षापासून निळवंडेच्या कालव्यांचे काम रात्रंदिवस सुरू आहे. महसूल विभागामध्ये डिजिटल सातबारा, इ पीक पाहणी असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या सर्व विकासाच्या वाटचालीत सर्वांचे योगदान महत्त्वाचे असून हीच परंपरा आपण कायम ठेवण्यासाठी सर्वांनी आपला तालुका आपली अस्मिता म्हणून एकत्रित काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.

ॲड.माधवराव कानवडे म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांची समृद्ध परंपरा जपताना नामदार बाळासाहेब थोरात यांनी सर्व समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा कायम सन्मान केला आहे. काम करणाऱ्या व्यक्तींना संधी दिली आहे. पाराजी चकोर यांनी आपले आयुष्य सहकारात समर्पित केले. अतिशय निष्ठावंत वागणारी अशा माणसांचे जीवन हे पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक असल्याचे ते म्हणाले.

रणजितसिंह देशमुख म्हणाले की, सरपंच ते राजहंस दूध संघाचे चेअरमन हा प्रवास पाराजी पाटलांनी करताना कायम सहकारमहर्षी दादांच्या विचारांवर श्रद्धा ठेवली. आयुष्याच्या उत्तरार्धात ते ही अत्यंत समृद्ध व सुखी जीवन जगत असून निस्वार्थी केलेले भावनेने काम हीच त्यांच्या जीवनातील आनंदाचे रहस्य आहे.
ज्येष्ठ नेते पाराजी चकोर म्हणाले की, नामदार बाळासाहेब थोरात यांनी माझ्यावर काय विश्वास टाकला. कायम वडीलधारी या नात्याने खूप आदर सन्मान केला असल्याचे ते म्हणाले. यावेळी बाबा ओहोळ, शंकर खेमनर,गणपत सांगळे, राजेंद्र चकोर यांचीही भाषणे झाली.

किशोर वाघमारे,विनायक थोरात,तुकाराम दातीर, भिमाजी राहींज, विष्णुपंत रहाटळ, संतोष मांडेकर, बाबासाहेब गायकर,गोरख नवले, इंद्रजीत खेमनर, सुभाष गुंजाळ, सिताराम वर्पे, नितीन सांगळे, पांडुरंग वाघमारे गुरुजी, प्रा.बाबा खरात, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सूर्यभान सानप, सुनिल नागरे, अनील कांगणे, साहेबराव तांबे, सोन्याबापु लबडे, मच्छिंद्र चकोर, संतोष सानप, छबू नागरे आदीसह खळी, झरेकाठी,दाढ,चनेगाव,पिंपरी लौकी अजमपुर या गावांमधील विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. सर्जेराव चकोर यांनी आभार मानले.
