चौका-चौकात भोंगे लावून हनुमान चालीसाचे पाच वेळा पठण करणार ;
संगमनेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा
प्रतिनिधी —
संगमनेर शहर व ग्रामीण भागात मशिदीवर लावण्यात आलेले भोंगे तात्काळ काढून टाकावेत अन्यथा तेवढेच भोंगे लावून दिवसातून पाच वेळा हनुमान चालीसाचे पठण करण्यात येईल असा इशारा संगमनेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलेला आहे. आज या संदर्भाने उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून मशिदीवरील भोंगे विनापरवाना लावून मोठ्या आवाजात अजाण केले जाते. त्याचा आवाज सुद्धा मोठा असल्याने अनेकांना त्याचा त्रास होतो. तसेच शुक्रवारी या आवाजाचे प्रमाण जास्तच वाढलेले असते. त्यामुळे मशिदीच्या आजूबाजूला व परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या नियमापेक्षा डेसिबल जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते आणि ध्वनी प्रदूषण नियमाचे उल्लंघन होत आहे. या आवाजाने अनेक वृद्ध आणि लहान मुले व रुग्णांना मानसिक त्रास होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे कुठल्याही प्रकारे पालन केले जात नाही. पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

तसेच देशामध्ये अनेक आतंकवादी हे मदरसा आणि मशीद मध्ये आश्रय घेतात हे सिद्ध झालेले आहे. म्हणून पोलीस प्रशासनाने चौकशी करणे गरजेचे आहे. यासंदर्भात निवेदनाची दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रत्येक चौकाचौकात भोंगे लावून हनुमान चालीसा दिवसातून पाच वेळेस पठण करण्यात येईल.

याप्रसंगी व त्यामुळे काही जातीय तेढ निर्माण झाली तर त्यास सर्वस्वी पोलिस जबाबदार असतील.त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची राहील.
निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष अशोक शिंदे, शहराध्यक्ष तुषार ठाकूर, शरद गोरडे, दीपक वर्पे, रामा शिंदे, सखाराम फापाळे, संजय शिंदे, अविनाश भोर, प्रवीण हांडे, अक्षय सातपुते यांच्या स्वाक्षर्या आहेत.
