आनंद वर्पे यांची तालुका किसान काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड
प्रतिनिधी —
युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष व चिकणी येथील युवा कार्यकर्ते आनंद वर्पे यांची संगमनेर तालुका शेतकरी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली असून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर नामदार थोरात यांच्या हस्ते आनंद वर्पे यांचा सत्कार झाला यावेळी तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, जि प सदस्य रामहरी कातोरे, भारत वर्पे,मीनानाथ वरपे, रमेश गफले आदी उपस्थित होते.

काँग्रेसचे गटनेते नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या व त्याबाबत संघटितपणे आवाज उठवण्यासाठी काँग्रेस शेतकरी सेल काम करत असून या सेलच्या अध्यक्षपदी आनंद वर्पे यांची निवड झाली आहे. त्यांनी यापूर्वी संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले आहे.

त्यांच्या निवडीबद्दल आमदार डॉ. सुधीर तांबे,सत्यजीत तांबे, इंद्रजीत थोरात, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, विलास वर्पे, सुभाष सांगळे व विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
