अकोले तालुक्यातील पर्यटन व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्याचा जिल्हा बँकेचा प्रयत्न — उदय शेळके

 प्रतिनिधी —

अकोलेकरांच्या जिल्हा सहकारी बँकेत कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आहेत, मात्र त्या तुलनेत कमी कर्ज अकोले करांनी घेतलेले आहे. इतर तालुक्याचे तुलनेत अकोले तालुक्यातील कर्जदार काहीही करतील प्रसंगी सोने गहाण ठेवतील पण आपल्या बँकेचे कर्जाचे पैसे ३१ मार्चपुर्वी भरतील अशी प्रामाणिक लोकं अकोले तालुक्यातील असल्याचे गाैरवोदगार काढून तालुक्यातील पर्यटन विकासासाठी या भागातील तरूणांना पर्यटन व्यवसायास कर्जरुपाने मदत करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी केले आहे.

अकोले तालुक्यातील सर्व सचिव, विकास सोसायटीचे चेअरमन व संचालक याची अहमदनगर जिल्हा सहकारी बॅकेची वसुली संदर्भातील बैठक आज कै.भाऊसाहेब हांडे सभागृहात संस्थेचे चेअरमन उदय शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उदय शेळके बोलत होते.

व्यासपीठावर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यामान संचालक सीताराम गायकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, युवा संचालक अमित भांगरे, तज्ज्ञ संचालक मधुकर नवले, कार्यकारी संचालक वर्पे, ॲड.शांताराम वाळुंज, कारखाना संचालक अशोकराव देशमुख उपस्थित होते.

पुढे बोलताना उदय शेळके म्हणाले कि, आपल्या जिल्हा बँकेची वसुली चांगली अर्थात ८० टक्के च्या पुढे आहे. जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, पारनेर, नगर तालुक्याची वसुली नेहमी चांगली राहीली आहे. मात्र चालु वर्षी आपण माजी अध्यक्ष सीताराम गायकर,व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे आदि सर्वानी ठरवले आहे कि आपल्या जिल्हा बॅकेची वसुली हि ९५ टक्के च्या वर गेली पाहिजे. त्यात अकोले सर्वात पुढे राहीला पाहिजे. तसेच यासाठी आमच्या सर्व सचिव लोकांनी, सोसायटी चेअरमन व संचालक यांनी मेहनत घ्यावी असे आवाहन केले.

आपली बँक शेड्यूल्ड बँक नसल्याने घरकुलासाठी जादाची रक्कम देता येत नाही. तरी आपण त्यात काही करता येईल का याचाही प्रयत्न करु. तसेच अकोले हा साैदर्याने नटलेला डोंगरदऱ्याचा तालुका आहे. येथील पर्यटनाला व आदिवासी तरूणांना मदत करण्यासाठी आमचे संचालक यांचा कायम पाठपुरावा असतो. त्यामुळेच आता तालुक्यातील पर्यटन व्यवसायाला व आदिवासी तरुणांना मदत करण्याचा बॅकेचा प्रयत्न असल्याचेही चेअरमन शेळके यांनी सांगितले.

सीताराम गायकर म्हणाले कि, जिल्हा बँकेच्या माध्यमातून सातत्याने तालुक्यातील अल्पभुधारक शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे. तालुक्यात कमी क्षेत्र असलेले शेतकरी जास्त आहेत. जिल्ह्यातले अकोले, संगमनेर, पारनेर, नगर या तालुक्याचा वसुली दर चांगला राहिला आहे. गेल्या काही वर्षापासून दुष्काळ, अतिवृष्टी, अनियमित विजपुरवठा या दृष्टचक्रामुळे थोडी फार थकबाकी झाली होती. मात्र मार्च अखेर पूर्वी जास्तीत जास्त वसुल होईल.

आज जिल्हा बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन अकोलेत आल्यानंतर जसे मोठ्या संख्येने तालुक्यातील सर्व सचिव, चेअरमन व पदाधिकारी उपस्थित राहीले तसेच जास्तीत जास्त वसूल देवून अध्यक्षांचे अकोलेत स्वागत करा असे आवाहन करुन तालुक्यात थकबाकी कधीही राहणार नाही आसे सांगत बँकेनेही घरकुल साठी दिले जाणाऱ्या कर्ज रकमेत वाढ करण्यात यावी अशी सुचना केली.

उपस्थितांचे आभार कैलास देशमुख यांनी मानले

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!