शेतकी संघाच्या चेअरमनपदी संपतराव डोंगरे तर व्हा. चेअरमन पदी सुनिल कडलग यांची निवड
प्रतिनिधी —
अमृत उद्योग समूहाची मातृसंस्था असलेल्या संगमनेर शेतकी सहकारी संघाचे चेअरमन शिवाजीराव थोरात यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर नव्याने चेअरमनपदी संपतराव डोंगरे यांची तर व्हा. चेअरमन पदी सुनिल कडलग यांची निवड झाली आहे.

शेतकी संघाच्या अतिथी गृहात निवडणूक निर्णय अधिकारी उपनिबंधक गणेश पुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ही निवड करण्यात आली.

यावेळी बाजीराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, पांडुरंग घुले आदींसह विद्यमान संचालक तुळशीनाथ भोर, रंगनाथ फापाळे, अर्जुन घुले, आत्माराम हासे, रामभाऊ कडलग, राम तांबे, बाबासाहेब जोंधळे, साहेबराव बारवे, कमलेश नागरे, रवींद्र गायकवाड, किसन वाळके, भाऊसाहेब खेमनर, पद्माताई कार्ले, केशरबाई सानप, मॅनेजर अनिल थोरात, कार्यालयीन अधीक्षक बी. एन. काळे, अण्णासाहेब घोगरे, मनोहर गुंजाळ,भास्कर वरपे, उत्तम वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा शेतकी संघ हा राज्यात एक नंबरचा असून राज्यातील अनेक शेतकी संघ मोडकळीस आले आहेत.मात्र संगमनेरातील सहकारी संस्थांच्या आदर्श तत्त्वांवर कार्यरत असलेला हा संघ इतर संघांसाठी दिशादर्शक ठरला आहे. या संघाचे चेअरमन शिवाजीराव थोरात यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विद्यमान व्हाईस चेअरमन संपतराव डोंगरे यांची तर ज्येष्ठ संचालक सुनील कडलग यांची व्हा.चेअरमन पदी एक मताने निवड झाली आहे.

या निवडीबद्दल आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, इंद्रजीत थोरात, रणजितसिंह देशमुख, सत्यजित तांबे, बाबा ओहोळ, अमित पंडित, रामहरी कातोरे, शंकर खेमनर, मीरा शेटे, सुनंदा जोर्वेकर, विश्वास मुर्तडक, हौशीराम सोनवणे, राजेंद्र कडलग, राजेंद्र गुंजाळ यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

