जुगार व गावठी हातभट्टीवर एकाच दिवशी १३ छापे ; एलसीबीची कारवाई

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईची मोहीम तीव्र केली असून, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी जुगार व गावठी हातभट्टीच्या अड्ड्यांवर एकाच दिवशी तब्बल १३ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १३ गुन्हे दाखल करून एकूण १८ हजार ९९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, पंकज व्यवहारे, सतीष भवर, अतुल लोटके, अभिजीत अरकल, रमीजराजा आतार व आजिनाथ पाखरे यांची दोन पथके तयार केली.

या पथकांनी कोतवाली, श्रीरामपूर शहर आणि श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध जुगार व गावठी हातभट्टीच्या ठिकाणांची माहिती घेत कारवाई केली.

कारवाईदरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराचे ४ गुन्हे दाखल करून ४ हजार ९३० रुपये, तर गावठी हातभट्टीप्रकरणी १ गुन्हा दाखल करून ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराचे ६ गुन्हे दाखल करून ७ हजार ९२० रुपये, तर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराचे २ गुन्हे दाखल करून २ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अशा प्रकारे एकाच दिवशी १३ ठिकाणी छापे, १३ गुन्हे दाखल आणि १८,९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!