अमृतवाहिनीच्या गौरी सांगळे ची जागतिक अबॅकस स्पर्धेसाठी निवड

राष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक
प्रतिनिधी —
अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी गौरी सुभाष सांगळे हिने राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला असून तिची जागतिक अबॅकस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

संगमनेर मधील देवांग क्रिएशनच्या वतीने पामा ग्लोबल अबॅकस व मानसिक अंकगणित जागतिक स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एका मिनिटात अबॅकस पद्धतीने गणित सोडवणे व दिलेले गणित कमीत कमी वेळेत अबॅकस पद्धतीने सोडवणे असे याचे स्वरूप होते. यात राष्ट्रीय स्पर्धेत गौरी सुभाष सांगळे ही अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी द्वितीय आली आहे. आता तिची जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली असून या स्पर्धेत मलेशिया, थायलंड, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, रशिया, चीन यांसह 22 विविध देशातील स्पर्धेक सहभागी होणार आहेत.

अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने गौरी सांगळे हिने या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. तिचा राष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला आहे. तिच्या या यशामुळे तिची आता जागतिक ॲबॅकस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

गौरी सांगळे हिच्या यशाबद्दल राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या विश्वस्त शरयु देशमुख, इंद्रजीत थोरात, दुर्गाताई तांबे, सत्यजित तांबे, रणजितसिंह देशमुख, बाबा ओहोळ, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, जि.प. सदस्य महेंद्र गोडगे, भारत मुंगसे, सुभाष सांगळे, लक्ष्मण सांगळे, कैलास सांगळे, एकनाथ मुंगसे, राजेंद्र कहांडळ, राजेंद्र मुंगसे ,नामदेव कहांडळ, संजय लहारे, संजय सांगळे, अशोक सांगळे, विश्वनाथ आरोटे, इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका जे.बी.शेटटी, हरिभाऊ दिघे, बाबासाहेब कांदळकर आदींनी अभिनंदन केले आहे.
