बीएसटी महाविद्यालयाची ऋतुजा जोंधळे विज्ञान शाखेत पुणे विद्यापीठात प्रथम
थोरात महाविद्यालयाला सुवर्णपदकाचा मान

प्रतिनिधी —
गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी काम करणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विज्ञान विभागातील ऋतुजा शिवाजी जोंधळे हीने विद्यापीठात प्रथम येत सुवर्णपदकाचा मान मिळवला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. दीनानाथ पाटील म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सर्व अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वातावरण, उच्च विद्या विभूषित प्राध्यापक व गुणवत्ता यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या करिअर निर्मितीची मोठी संधी मिळत आहे. यावर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात या महाविद्यालयाची ऋतुजा शिवाजी जोंधळे ही विज्ञान शाखेत सर्वप्रथम आली असून तिला के. के .वाघ सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. ही महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.

ऋतुजा जोंधळे यांच्या यशाबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ सुधीर तांबे, सचिव लक्ष्मणराव कुटे, दुर्गा तांबे, सहसचिव दत्तात्रय चासकर, रजिस्ट्रार बाबुराव गवांदे, प्राचार्य डॉ पाटील, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, प्रा शिवाजी नवले, प्रा. लक्ष्मण घायवट ,प्रा. विजय कुमार पांडे, माधव जाधव, गोरक्षनाथ पानसरे यांचेसह सर्व प्राध्यापक, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

