संगमनेर वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.सुहास आहेर
प्रतिनिधी —
संगमनेर तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी साई संस्थान शिर्डीचे विश्वस्त ॲड. सुहास आहेर यांची सलग चौथ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली असून उपाध्यक्षपदी ॲड. उदयसिंह ढोमसे तर महिला उपाध्यक्षपदी ॲड. सुनंदा वाणी यांची निवड झाली आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथिगृहावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संगमनेर वकील असोसिएशन मध्ये झालेल्या या बिनविरोध निवडी अध्यक्षपदी ॲड.सुहास आहेर उपाध्यक्षपदी ॲड. उदयसिंह ढोमसे महिला उपाध्यक्ष ॲड. सुनंदा वाणी, सेक्रेटरीपदी ॲड. मोहन फटांगरे, सह सेक्रेटरी ॲड. अमोल घुले, खजिनदारपदी ॲड. तात्यासाहेब गुंजाळ, तर सदस्यपदी ॲड. प्रशांत गुंजाळ, ॲड. अविनाश गोडगे, ॲड. किरण रोहम, ॲड. प्रशांत गव्हाणे, ॲड. माया पवार यांची एकमताने निवड झाली आहे.

ॲड.सुहास आहेर हे मागील चार वर्षापासून अध्यक्षपद सांभाळत असून त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून नवीन न्यायालय इमारत उभारणी तसेच त्या ठिकाणी कामकाज स्थलांतरित करणे, वकील बार असोसिएशन करता स्वतंत्र २१ गुंठे जागा मिळवली आहे. तसेच कोरोना संकटामध्ये महाराष्ट्र राज्य बार कौन्सिल कडून संगमनेर करीता ३० लाख रुपयांचा निधी मिळवला आहे.

या निवडीनंतर बोलताना ॲड. सुहास आहे म्हणाले की, सर्व वकील बंधू भगिनींच्या सहकार्यातून या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. आपण सातत्याने बार असोसिएशनच्या हिताचे निर्णय घेतले असून अनेक विकासकामांसाठी पाठपुरावा केला आहे. आगामी काळात वकिलांच्या चेंबर साठी पाच मजली इमारत उभी करणे, पार्किंग शेड, फर्निचर, याचबरोबर बागबगीच्या यासाठीही आपण पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले.

या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ सुधीर तांबे, दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, डॉ.जयश्री थोरात, सत्यजीत तांबे, रणजितसिंह देशमुख, बाबा ओहोळ, ॲड. अरविंद गणपुले, ॲड. बापूसाहेब गुळवे, ॲड.अरुण आहेर, ॲड. डी.आर.वामन, ॲड. संजय दिक्षित,ॲड.अतुल आंधळे, ॲड.सदाशिव थोरात, ॲड. प्रदीप मालपाणी, ॲड. विवेक बोऱ्हाडे, ॲड.नईम इनामदार, ॲड.अशोक हजारे, ॲड.मधुकर गुंजाळ यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
