अहिल्यानगरमध्ये गुटखा-मावा माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
४१ गुन्ह्यांमध्ये तब्बल ९४ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ; ५८ आरोपी अटक
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क :
अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध मावा, पानमसाला, गुटखा आणि सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. दिनांक १५ जून २०२६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत छापे टाकून ४१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ५८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ९४ लाख ६८ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेळोवेळी पथके नेमली. या पथकांनी विशेषतः जिल्ह्यात अवैध मावा, पानमसाला, गुटखा आणि सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्या व्यक्तींची माहिती संकलित केली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे १५ जून २०२६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत छापे टाकून अवैध गुटखा व माव्याविरोधात कारवाई करण्यात आली.
या विशेष मोहिमेदरम्यान गुटखा/मावा विक्रीप्रकरणी एकूण ४१ केसेस दाखल करण्यात आल्या असून, ५८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्व कारवायांमध्ये ९४,६८,२९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईचा तपशील
– कारवाई : गुटखा/मावा
– एकूण केसेस : ४१
– अटक आरोपी : ५८
– जप्त मुद्देमाल : ९४,६८,२९० रुपये
अवैध मावा, गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेकडून यापुढेही अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ही संपूर्ण कारवाई मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
