जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते ध्वजारोहण
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. उपस्थितांनी राष्ट्रगीताचे गायन करून राष्ट्रध्वजाला अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी तसेच उपस्थित नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ध्वजारोहण कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा भिडे, भूसंपादन अधिकारी श्रीमती सावंत, उपजिल्हाधिकारी दळवी, जिल्हा सूचना विभागाचे पवन टेंभुर्णे, नगर विकास विभागाचे सहसंचालक पठारे, तहसीलदार मयूर बेरड, गायकवाड, श्रीमती पुजारी, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्यासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस अधिकारी, निमंत्रित मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
