गांजा तस्कर पकडला ! दुसरा फरार !!

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

बेलवंडी पोलीस ठाण्याच्या पथकाने विसापूर येथे अमली पदार्थविरोधी कारवाई करत गांजाची विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली असून मुख्य आरोपी फरार झाला आहे. या कारवाईत ७८० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (दि. २८ जून) एपीआय नंदकुमार सोनवलकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, विसापूर येथील अमीन शफी शेख हा भाई-भाई चिकन सेंटर येथे गांजाची विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने छापा टाकला.

छाप्यात गुंजीलाल कान्हा मेहता (वय २४, रा. शेंदवा, ता. शेंदवा, जि. बडवानी, मध्य प्रदेश) हा गांजाची विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून ७८० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी अमीन शफी शेख हा घटनास्थळावरून पसार झाला. त्याचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी अंमली पदार्थ बाळगणे व विक्री करण्याच्या उद्देशाने साठा ठेवल्याप्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (कर्जत विभाग) सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस हवालदार भाऊसाहेब यमगर, धर्मराज दहिफळे, भाऊसाहेब शिंदे तसेच पोलीस शिपाई दादा क्षीरसागर, विनोद पवार आणि विठ्ठल खरमाळे यांनी पार पाडली.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!