संगमनेर उपविभागातील आठ जण जिल्ह्यातून तडीपार !

संगमनेर प्रतिनिधी – 

संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६(१)(अ)(ब) अन्वये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आठ जणांना जिल्ह्याबाहेर तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. संगमनेर शहर, संगमनेर तालुका, अकोले व राहाता पोलीस ठाण्यांनी सादर केलेल्या प्रस्तावांवर सुनावणी घेऊन ही कारवाई करण्यात आली.

तडीपार आदेशानुसार संबंधितांना अहमदनगर जिल्ह्यासह पुणे व नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांत ठरावीक कालावधीसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तडीपार करण्यात आलेल्या व्यक्ती

1. राजेश विठ्ठलराम सानप (संगमनेर तालुका) 

2. सागर भाऊसाहेब खताळ (अकोले) 

3. सागर विजय खताळ (अकोले) 

4. अनिल निवृत्ती खताळ (अकोले)

5. दादासाहेब निवृत्ती खताळ (अकोले) 

6. बाबू किसन चौधरी (अकोले)

7. शफीक रजाक शेख (संगमनेर शहर) 

8. गणेश चंद्रन कुचटे (राहाता) 

पोलिसांनी गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!