ओझर बंधाऱ्याजवळ प्रवरा नदीत वाळू उपसा !

नदीच्या प्रवाहाला अडथळा आणि पुराचा धोका निर्माण झाल्याची फिर्याद 

 संगमनेर प्रतिनिधी

प्रवरा नदीच्या पात्रात वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आता या वाळू उपश्या मुळे नदीतील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत असून पुराचा धोका देखील निर्माण झाला आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओझर बंधाऱ्याच्या परिसरात प्रवरा नदी पात्रातून वाळू चोरी करण्यात आली आहे. यासंदर्भात पाट बंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी फिर्यादी दिली आहे. आश्वी पोलिसांनी अज्ञात वाळू तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रीतम बाळासाहेब शेवाळे, उपविभागीय अभियंता, संगमनेर पाटबंधारे उपविभाग यांनी फिर्यादी दिली असून ओझर बंधाऱ्याच्या वरील बाजूस प्रवरा नदी पात्रात वाळू उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रामध्ये मोठ मोठे खड्डे तयार होऊन पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे. त्यामध्ये नदीचा प्रवाह मंदावला व आवर्तन काळात विस्कळीतपणा येऊन आवर्तन कालावधी वाढला आहे. पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनाचे नुकसान झाले आहे. तसेच पाणी खराब व प्रदूषित झाले आहे. नदीपात्रातील वाळू वाहण्याकरता नदीपात्राच्या तिरास बाधा निर्माण होऊन पुराचा धोका देखील निर्माण झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले असून पोलिसांनी अज्ञात वाळू तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

तर दुसऱ्या एका फिर्यादीमध्ये योगेश जगन्नाथ घोगरे उपविभागीय अधिकारी प्रवरा डावा कालवा सिंचन व्यवस्थापन उपविभाग, लोणी, तालुका राहाता यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, प्रवरा डावा कालवा व प्रवरा नदीची पाहणी करत असताना ओझर बंधाऱ्याच्या खालील बाजूस अज्ञात व्यक्तींनी वाळू उपसा केल्याचे दिसून आले. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला. तसेच पाणी प्रदूषित झाले. नदीपात्रातील वाळू वाहण्याकरता नदीपात्राच्या तीरास बाधा निर्माण होऊन पुराचा धोका निर्माण झालेला आहे. याही संदर्भात आश्वी पोलिसांनी अज्ञात वाळू तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!