जयहिंद लोकचळवळच्या उपक्रमातून रोजगाराच्या नव्या संधी — माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

आता कौशल्यालाही मिळणार शैक्षणिक मान्यता

 संगमनेर प्रतिनिधी —

कौशल्याधारित काम करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या अनुभवाच्या आधारे अधिकृत शैक्षणिक प्रमाणपत्र मिळावे, यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व शिक्षण मान्यता मूल्यांकन केंद्राच्या माध्यमातून प्राथमिक बैठक सह्याद्री महाविद्यालय, संगमनेर येथे आयोजित करण्यात आली. या उपक्रमामुळे अनेकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला.

या बैठकीचे आयोजन जयहिंद लोकचळवळचे समन्वयक उबेद शेख, सुनिता कांदळकर, अंजुम बागवान यांनी केले. यावेळी जयहिंद लोकचळवळचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीरजी तांबे, पूर्व शिक्षण मान्यता केंद्राचे संचालक डॉ. राम ठाकर, विद्यार्थी सेवा विभागाचे डॉ. प्रकाश देशमुख, जयहिंद महिला मंच अध्यक्षा दुर्गाताई तांबे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्रशासकीय संयोजक अतिक शेख, नगरसेवक डॉ. दानीश शेख, ज्ञानेश्वर नाईक, फैजान तांबोळी, मोहसीन शेख, आवेज खान उपस्थित होते.

आर्थिक अडचणींमुळे अनेक तरुण-तरुणींना औपचारिक शिक्षण घेता येत नसले तरी ते इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मेकॅनिक, वायरमन, विणकाम, शिवणकाम, टेलरिंग अशा विविध क्षेत्रांत प्रवीणतेने काम करत असतात. मात्र, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या अभावामुळे त्यांना नोकरीच्या चांगल्या संधींपासून वंचित राहावे लागते.

या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अशा कुशल नागरिकांना त्यांच्या कौशल्याचे अधिकृत प्रमाणपत्र मिळणार असून, त्यातून त्यांना रोजगार, प्रगती आणि सामाजिक सन्मान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जयहिंद लोकचळवळच्या या उपक्रमामुळे कौशल्याला मान्यता मिळून अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी माजी आमदार डॉ. तांबे यांनी व्यक्त केला.

जयहिंद लोकचळवळचे अधिकृत मासिक आता महाराष्ट्रभरात पोहोचत असून आपणही त्याचा लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क – 8793562665

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!