शिखर शिंगणापूरची कावड घेऊन जाणाऱ्या भक्ताला बेदम मारहाण !

धांदरफळच्या 11 जणांवर गुन्हा दाखल 

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क 

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथून शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाला पायी जाऊन परतत असताना आणि महाल काठी कावड खांद्यावर असताना धांदरफळ येथील शिवभक्त मनोज सुरेश खुरपे यांना गावातील तरुणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करण्याची घटना घडली असून यामध्ये धांदरफळ येथील 11 जणांवर गुन्हा दाखल झाला असून त्यामध्ये एक जण अनोळखी आहे. सर्व आरोपी पसार झाले आहेत.

प्रशांत बाळासाहेब कोल्हे, ओमकार अण्णासाहेब तोरकडी, संतोष सुनील शिंदे, प्रवीण कारभारी शिंदे, विशाल अशोक कोल्हे, कौस्तुभ संजय बिडवे, आशिष मच्छिंद्र कोल्हे, निखिल संजय जाधव, विकास गोरख कोल्हे, कार्तिक कैलास कोल्हे आणि एक अनोळखी इसम अशी आरोपींची नावे आहेत हे सर्वजण संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील रहिवासी आहेत.

धांदरफळ बुद्रुक येथील रहिवासी मनोज सुरेश खुरपे (वय 34) हे आणि गावातील सुमारे 60 ते 70 गावकरी असे धांदरफळ ते शिखर शिंगणापूर येथे महाल काठी कावड घेऊन जात असताना खुरपे यांच्याकडे जेवणाचे आणि मुक्कामाचे नियोजन होते. परतीच्या प्रवासात आंबेगाव तालुक्यात जेवण झाल्यानंतर बोरी आळे रोडला खुरपे यांच्या खांद्यावर कावड असताना गावातील त्या तरुणांनी तू जेवणाच्या आणि मुक्कामाच्या नियोजनात मनमानी करतोस असे कारण काढून खुरपे यांना बेदम मारहाण केली.

या जीवघेण्या मारहाणीमुळे खुरपे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आळेफाटा पोलीस स्टेशन (पुणे जिल्हा) येथे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!