विदेशी चलनासह बॅग लिफ्टिंग करणारे पकडले !
एलसीबीची कारवाई
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
बस स्थानक आणि इतर परिसरातून प्रवाशांच्या बॅगा उचलून नेणारे व त्यातील सामान सोडणारे दोन पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून विदेशी अमेरिकन चलनासह 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
आशिष रविंद्र मंगलम (वय 20 वर्षे, रा. अशोकनगर, श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर) विठ्ठल संजय शेलार (वय 20 वर्षे, रा. अशोकनगर, निपाणीवडगांव, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

या दोन्ही आरोपींनी शिर्डी येथे एका प्रवाशाची बॅग चोरून त्यातील मुद्देमाल लंपास केला होता. एलसीबीच्या पथकाने या दोघांचा तपास करून त्यातील एकाला पकडले आणि त्याच्याकडून माहिती मिळाली असता हा उद्योग दोघांनी केल्याचे समोर आले. या संदर्भात पुजीता गोविंद रेड्डी (वय- 25 वर्षे रा. 3-8-381 जयनगर, बोलमानडोंडील रायचुर, कर्नाटक) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीच्या बॅगेतील मोबाईल आणि परकीय चलन या दोन्ही आरोपींकडून हस्तगत करण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पोलीस अंमलदार, राहुल द्वारके, भिमराज खर्से, राहुल डोके, सतिष भवर, चालक भगवान धुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
