विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाचा संगमनेर तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा !

 17 जणांवर गुन्हा दाखल ; 3 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 

चार पोलीस स्टेशन, एक पोलिस उपअधीक्षक तरीही अवैध धंदे फोफावले… 

तालुका पोलिसांचे पितळ उघडे पडले !

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

विविध अवैध धंद्याने नटलेल्या संगमनेर तालुक्यातील मोठ्या जुगार अड्ड्यावर थेट नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने छापा टाकून 17 जणांवर गुन्हा दाखल केला. 3 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या ‘सांगवी’ गावातील ‘रानवारा’ हॉटेलमध्ये हा जुगाराचा अड्डा सर्रासपणे सुरू होता. तालुका पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले होते की, हे संगणमताने चालू होते हे लवकरच समोर येईल. या कारवाईने मात्र तालुका पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे.

खालील व्यक्तींवर उन्हाला दाखल करण्यात आलेला आहे.

अंकुश मधुकर नालकर (रा. वाडेकर गल्ली, संगमनेर शहर. ता. संगमनेर), संदिप गंगाधर भरीतकर ( रा. भरीतकरमळा, अकोले नाका ता. संगमनेर), भाऊसाहेब दत्तु फरगडे (रा. निमगाव, ता. संगमनेर), संदिप विद्याधर दारोळे (रा. केळी रुंभोडी, ता. अकोले), अमोल रघुनाथ पांडे (रा. नवलेवाडी, ता. अकोले), प्रभाकर सखाराम कोटकर (रा. कुंभेफळ, ता. अकोले), आनंद देवराम सारोक्ते (रा. चिरेबंदी, ता. अकोले), सागर रमेश कानवडे (रा. निमगाव बु. ता. संगमनेर), सुधीर प्रकाश बनकर (रा.धांदरफळ, ता. संगमनेर), राजेश मल्लु गायकवाड (रा.शिवजीनगर, ता. संगमनेर) बाबासाहेब बाबुराव चौधरी (रा. गणोरे, ता. अकोले), सुनील केशव धात्रक (रा. अशोक चौक, ता. संगमनेर), विक्रम मधुकर नालकर (रा. वाडेकर गल्ली, ता. संगमनेर), सुनील प्रभाकर वाडेकर (रा. वाडेकर, ता. संगमनेर), सतीश गुलाब वाळुंज (रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर), अफजलखान अन्सार पठाण (रा. नाईकवाडपुरा, ता. संगमनेर), अक्षय मारुती वाकचौरे (रा. परखतपुर, ता. अकोले) या 17 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर शहरासह संपूर्ण तालुक्यात अवैध धंद्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. तालुक्यात चार चार पोलीस स्टेशन असून आणि पोलीस उपअधीक्षक दर्जाचे वरिष्ठ अधिकारी असून देखील संगमनेर मध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावले आहेत. अवैध कत्तलखाने, गोवंश जनावरांची अवैध वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक, ढाबे हॉटेलवर मिळणारी बेकायदेशीर देशी-विदेशी दारू, मटका अड्डे, जुगार अड्डे, असे अनेक प्रकारचे अवैध धंदे संपूर्ण तालुक्यात सुरू आहेत. चारही पोलीस स्टेशनकडून कोणतीही कारवाई होत नाही. जी काही कारवाई होते ती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाकडून केली जाते. मग आश्वी, घारगाव, संगमनेर शहर आणि संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी आणि पोलीस नेमके काय करतात असा सवाल उपस्थित होतो.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!