प्रेरणा दिनानिमित्त अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मध्ये 150 विद्यार्थ्यांचे रक्तदान
संगमनेर | प्रतिनिधी —
अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा दिन संगमनेर तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा झाला असून अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मध्ये 150 विद्यार्थ्यांनी रक्तदान करून प्रेरणा दिनामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.

अमृतवाहिनी पॉलिटेक्निक व अर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या रक्तदान शिबिरांप्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे,व्यवस्थापक प्राचार्य व्ही.बी.धुमाळ, उपप्राचार्य जी.बी.काळे,अकॅडमी डायरेक्टर डॉ.जे.बी.गुरव, विभाग प्रमुख मिलिंद इंगोले, नामदेव गायकवाड, ए.बी.वरपे, अशोक वाळे, एस.एस.कोटकर, वाय.एन.दिघे, के.आर.कोल्हे,एस.एस.बोराडे, बी.बी आसणे, बि.के.उगले आदी उपस्थित होते.

लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी तंत्रनिकेतन्य सातत्याने सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे प्रेरणा दिनानिमित्त दरवर्षी पॉलिटेक्निक मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन होत असून यावर्षी 150 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

यावेळी बोलताना अनिल शिंदे म्हणाले की, अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासाला प्राधान्य दिले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकाराच्या माध्यमातून संगमनेर तालुका उभा केला. आज लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा राज्यातील प्रगतशील तालुका म्हणून ओळखला जातो. याचबरोबर संगमनेर हे शिक्षणाचे केंद्र झाले आहे. विद्यार्थ्यांनी नेहमी संशोधन वृत्ती जोपासणे गरजेचे असून रक्तदानामुळे आपण कोणाचे तरी प्राण वाचवतो याचे मोठे समाधान असल्याचे ते म्हणाले.

तर प्राचार्य धुमाळ म्हणाले की, अमृतवाहिनी पॉलिटेक्निकचा नुकताच निकाल जाहीर झाला असून सर्व विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे.
या रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ सुधीर तांबे शरयू देशमुख, डॉ.जयश्री थोरात यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
