संगमनेरात पुन्हा जबरी चोरी !      साडेपाच तोळ्याचे गंठण लांबविले !!

संगमनेर प्रतिनिधी —

संगमनेर बस स्थानकावर मंगळसूत्र चोरीच्या घटना वारंवार घडत असतानाच आता शहरात आणि उपनगरात देखील जबरी चोऱ्या घडू लागल्या आहेत. यामध्ये चेन स्नॅचिंग चा प्रकार वाढला असून एका महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळे वजनाचे गंठण मोटार सायकल वरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून लांबवले आहे.

संगमनेरात वेगवेगळ्या अवैध धंद्यांबरोबरच मंगळसूत्र चोरांनी देखील धुमाकूळ घातला आहे. बसस्थानकावर वारंवार मंगळसूत्र चोरी, महिलांच्या पर्स लांबविणे, पाकीट मारी असे प्रकार घडत आहेत. यात भर म्हणून की काय आता चेन स्नॅचिंगचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. उपनगरात आणि शहरातील गजबज नसलेल्या भागात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र गंठण लांबविण्याचे प्रकार घडत आहेत.

विशेष म्हणजे पायी चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने मोटार सायकल वरून येणारे चोरटे अक्षरशः ओरबाडून चोरून नेत आहेत. शहरातील गणेश नगर या उपनगरात देखील अशीच घटना घडली आहे.

फिर्यादी नंदा आनंद असे ( राहणार राजापूर, तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर) या आपल्या संगमनेर शहरातील गणेश नगर या उपनगरातील मैत्रिणीला भेटायला पायी जात असताना विना नंबरच्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलवर दोन अज्ञात इसम डोक्यात काळया रंगाचे हेल्मेट घालून पाठीमागून आले आणि त्यांच्या गळ्यातील साडेपाच डोळे वजन असलेले गंठण हिसकावून बळजबरीने ओढून तोडून चोरून नेले.

सदर घटनेमुळे गणेश नगर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, शिवाय सदर घटना भर दिवसा आणि दुपारी घडल्याने आणखीनच भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस दप्तरी या सोन्याच्या गंठणाची किंमत 3 लाख 67 हजार रुपये अशी नोंदविण्यात आली आहे. शहर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक सावंत हे पुढील तपास करत असल्याची माहिती मिळाली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!