संगमनेरात चोरट्यांचा धुमाकूळ !
चेन स्नॅचिंग, सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी, दुकाने फोडली…
संगमनेर पोलिसांचा वचक संपला..
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून गंठण चोरी, सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी, दुकाने फोडून, घरात घुसून चोरी असे प्रकार घडले असून एकाच दिवसात 6 ते 7 ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत. संगमनेरात चोरट्यांची हिम्मत वाढली असून पोलिसांचा वतक मात्र संपल्याचे चित्र आहे. पोलिसांची रात्रीची गस्त देखील चालू आहे की नाही याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

शहरात सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामध्ये मंगळसूत्र गंठण चोरीचे प्रमाण जास्त आहे. आता त्याचबरोबर घराचे दरवाजांचे कुलपे तोडून दुकाने फोडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रकमा चोरण्याचे उद्योग देखील चोरट्यांनी केले आहे.
गाडीवरून जाणाऱ्या महिलेला थांबवून, पत्ता विचारण्याचा बहाना करून तिच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओरबाडून नेण्याचा प्रकार सुकेवाडी रोडवर घडला आहे. फिर्यादी महिला या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना पाठीमागून मोटरसायकलवर आलेल्या दोन इसमानी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करून गाडीचा वेग कमी केला असता पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादी महिलेच्या गळ्यातील एक तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र मिनी गंठण ओढून तोडून मोटरसायकल वरून पळून गेले आहेत.
या संदर्भात अश्विनी अरुण ताजणे (राहणार ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर) यांनी फिर्याद दिली असून घटना दुपारी भर दिवसा घडली आहे.

तर दुसऱ्या घटनेत महालक्ष्मी कॉलनी मालदाड रोड मध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरण्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये फिर्यादीच्या राहत्या घराचे दरवाजाचे कुलूप तोडून सोने-चांदीचे दागिने रोख रक्कम चोरण्यात आली. तसेच दत्तू भिकाजी आव्हाड (राहणार छत्रपती संभाजीराजे कॉलनी मालदार रोड घुलेवाडी) यांच्या घरातील पंधराशे रुपये रोख रक्कम घराचे कुलूप तोडून चोरून नेण्यात आले आहे. सोमनाथ विठ्ठल वेडे (राहणार श्रमगाथा कॉलनी एकता चौक संगमनेर) यांच्या घराचे कुलूप तोडण्यात आले आहे. दत्तात्रय अरुण जोशी (राहणार घुलेवाडी) यांच्या घराचे कुलूप तोडून कपाट फोडण्यात आले आहे. शांताबाई किसन सातपुते (राहणार मालदार रोड) यांच्या दोन शेळ्या गोठ्यातून चोरून नेण्यात आल्या आहेत. कैलास भाऊराव शेटे (राहणार तिरंगा चौक मालगाव रोड) यांचे घराचे लॉक तोडण्यात आले आहे. प्रकाश बबन गुंड (राहणार घुलेवाडी) दवाखाना व मेडिकल फोडले आहे. एकाच रात्रीतून एवढे उद्योग सरड्यांनी केले आहेत

तर तिसरी मोठी घटना गोल्डन सिटी अरगडे मळा संगमनेर या ठिकाणी झाली असून या ठिकाणीदेखील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरण्यात आली आहे. फिर्यादीच्या राहत्या घराच्या सेफ्टी गेटचे लॉक तोडून घरातून 82 हजार रुपयांचे ऐवज चोरून नेण्यात आलेला आहे. या संदर्भात प्रियंका संतोष ढोणे (राहणार गोल्डन सिटी) यांनी फिर्याद दिली असून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
