संगमनेर मध्ये पुन्हा घर फोडले !
सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी
संगमनेर | प्रतिनिधी —
संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शहर आणि उपनगराच्या परिसरात सातत्याने चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून घराचे दरवाजे फोडून घर फोड्या करून सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरी करण्याचे प्रमाण वाढतेच आहे.

संगमनेर शहरातील घुलेवाडी परिसरात घराच्या आत मध्ये असलेल्या पेटीतीचा कडी कोंडा तोडून पेटीतील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. यासंदर्भात सुरेखा तुकाराम मधे (राहणार घुलेवाडी तालुका संगमनेर) यांनी फिर्याद दिली असून आरोपीचे नाव देखील निष्पन्न झाले आहे. अजय रंगनाथ पवार (राहणार साखर कारखाना संगमनेर) अशी आरोपीच्या नावाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

या चोरीमध्ये एकूण 82 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास करण्यात आलेली आहे. संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस हेडकॉन्स्टेबल भांगरे हे पुढील तपास करीत आहेत.
