संगमनेरात कत्तलखान्यावर एलसीबी चा छापा !…

8 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 

संगमनेर शहर पोलीस करतात काय ?

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेर शहरातील जमजम कॉलनी मध्ये स्थानिक गुन्हे शाखा एलसीबी च्या पथकाने अवैध कत्तलखान्यात छापा टाकून 8 लाख 70 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

 

 संगमनेर शहर पोलीस करतात काय ?

सध्या संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) सातत्याने छापे टाकून मोठे कारवाई केली आहे. बऱ्याच आरोपींना याप्रकरणी अटक केली आहे. लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गोमांस नष्ट केले आहे. गोवंश जनावरांची सुटका केली आहे. ही सर्व कारवाई एलसीबी कडून होत आहे. मग स्थानिक शहर पोलीस नेमके करतात काय असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.

 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार संतोष खैरे, अमृत आढाव, योगेश कर्डीले, महादेव भांड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

अब्दुल समद जावेद कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) हा त्याच्या साथीदारासह गल्ली नं.06 जमजम कॉलनी संगमनेर येथे स्वतःच्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने आणुन त्यांची कत्तल करत असल्याची पथकास माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ छापा टाकला असता सदर ठिकाणी गोवंशीय जनावरांची कत्तल करत असतांना आढळून आले आले.

1) अब्दुल समद जावेद कुरेशी (वय- 27 वर्षे रा. गल्ली नं. 02 भारतनगर, संगमनेर, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) 2) सकलेन जाकीर कुरेशी (वय- 30 वर्षे रा. सदर) 3) रेहान अल्ताफ शेख, (वय – 20 वर्षे रा. दिल्ली नाका, इस्लामपुरा, संगमनेर ता.संगमनेर जि. अहिल्यानगर) या तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींच्या ताब्यातून 8,70,000/- रुपये किमतीचे 2 हजार 900 किलो गोमांस, 800/- रुपये किमतीची एक कुऱ्हाड, कासन व सुरी असा एकुण 8,70,800/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 23/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271, 325, 3(5) सह प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 (ब), 5(क), 9, 9(अ) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!