सकल मराठा समाज संगमनेर यांच्यावतीने शिवजयंती जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !
प्रतिनिधी —

सकल मराठा समाज संगमनेर शहर व तालुका यांच्यावतीने शिवजयंती जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी युवकांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.
१९ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

यामध्ये महिला,मुली व पुरुष,मुले यांच्यासाठी वेगवेगळ्या गटातून ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. मॅरेथॉन स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस १११११ रुपये, द्वितीय बक्षीस ७७७७ रुपये तृतीय बक्षीस ५५५५ रु चतुर्थ बक्षीस ११११ रु बक्षीस उत्तेजनार्थ देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

सकाळी ८ ते ८.३० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे.
८.३० ते ९.३० या वेळेत जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली शौर्यगाथा छत्रपती शिवाजी महाराजांची लहान मुलांना यावर नाटिका सादर करण्यात येणार आहेत.
९.३० ते १०.३० वाजता स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली शिवकल्याण राजा या नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

सर्व कार्यक्रम छत्रपती शिवाजीमहाराज स्मारक संगमनेर बस बसस्थानकाजवळ होणार आहेत
सर्व शिवप्रेमींनी covid-19 नियमांचे पालन करून शिवजयंती महोत्सवात सहभाग घ्यावा सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

