संगमनेरला धनशक्तीविरुद्ध जनशक्ती शक्तीची लढाई होणार – आमदार खताळ
संगमने टाइम्स न्यूज नेटवर्क —
विधानसभा निवडणुकीत जशी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई झाली आणि या लढाईत धनशक्तीचा पराभव होऊन जनशक्ती विजयी झाली तशीच लढाई संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत होत आहे. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे त्यामुळे विकास निधी आणून विकास करायचा असेल तर महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.

संगमनेर शहरातील शिवाजीनगर येथील जय हिंद सर्कल जवळ प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार रवींद्र बो-हाडे आणि इंदिरा नामन प्रभाग तीनचे उमेदवार मुकेश मुर्तडक आणि मंगल वर्पे तसेच प्रभाग क्रमांक चार चे उमेदवार प्रवीण दिड्डी आणि कविता फटांगरे नवघर गल्ली येथे प्रभाग क्रमांक आठचे उमेदवार प्रकाश राठी आणि पायल ताजणे प्रभाग 12 चे उमेदवार पुनम दायमा आणि उमेश ढोले घास बाजार येथे प्रभाग क्रमांक
११चे महायुती पुरस्कृत अपक्ष उमेदवार जावेद जहागीरदार आणि दिपाली कोळपकर प्रभाग 14 चे उमेदवार प्रवीण कर्पे आणि नीता मोहरीकर भाजप कार्यालया जवळ प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार अमित उर्फ बंटी मंडलिक आणि पुनम अनाप तसेच श्रमिक नगर येथे प्रभाग क्रमांक एकचे उमेदवार अभिजीत पुंड आणि मनीषा नेवासकर या सर्व महायुती उमेदवारां च्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत मतदारांना संबोधन करताना आमदार खताळ बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ भाजपचे श्रीराम गणपुले शिरीष मुळे शिवसेनेचे उपशहर प्रमुख अजित जाधव शशांक नामन अक्षय वर्पे डॉ महेंद्र कोल्हे भाऊ जाखडी सिद्राम दिड्डी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, संगमनेर शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून इंदिरा गांधी गार्डन उभारले आहे परंतु त्या सर्वच गार्डनची दुरावस्था झाली आहे. महायुतीची सत्ता आल्यानंतर त्या गार्डनची दुरुस्ती करून गार्डनच्या रक्षणासाठी सुरक्षारक्षक नेमणार आहे. चाळीस वर्षात यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारता आला नाही तो उभारण्यासाठी आपण महायुती सरकारच्या माध्यमातून जागा उपलब्ध झाल्यानंतर बसवणार आहे. नगरपालिकेच्या 30 वर्षाच्या कार्यकाळात काहीच करता आले नाही फक्त खोटे बोल पण रेटून बोल असे ते सांगत संगमनेरकराना फक्त थापा देत आहेत.

त्यांच्या भूल थापांना बळी न पडता महायुतीच्या मागे उभे रहा. नगरपालिकेचे भवितव्य आता ठरविण्याची वेळ आली आहे. संगमनेर नगरपालिका एवढी जुनी असतानाही यांना साधी हद्दवाढही करता आली नाही. संगमनेर नगर पालिकेत फक्त टीटी कंपनी कार्यरत होती. त्यामुळे शहरातील मूलभूत प्रश्न सुटू शकले नाही. संगमनेर मधील नेहरू गार्डन मध्ये असणारी रेल्वे तुम्हाला सांभाळता आली नाही तेव्हा तुम्ही काय रेल्वे आणणार वेळप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि रेल्वे मंत्री यांना भेटण्याची वेळ आली तरी चालेल तरी पण पुणे नाशिक रेल्वे ही संगमनेर मार्गेच न्यावी असे साकडे घालणार आहे. असेही खताळ यांनी सांगितले.
