कब्रस्तान, रस्ते, स्वच्छता, गार्डनसह विकासकामांसाठी महायुतीला मतदान करा – आमदार अमोल खताळ
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
गेल्या चाळीस वर्षांपासून सत्ता भोगूनही मुस्लिम समाजबांधवांचा फक्त मतासाठी वापर केला गेला . तुमच्या प्रभागातील कब्रस्तान गार्डन रस्ते स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधां ते देऊ शकले नाही असा गंभीर आरोप करून नगरपालिकेची सत्ता महायुतीच्या ताब्यात द्या सर्व प्रश्न मार्गी लावू असा विश्वासआमदार अमोल खताळ यांनी दिला

संगमनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकित प्रभाग क्र ९ मधील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ कुरण रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत खताळ बोलत होते यावेळी व्यासपीठावर निमोणचे सरपंच संदीप देशमुख नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ नगरसेवक पदाचे उमेदवार समीर शेख रोहिणी सातपुते भाजपा वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉ महेंद्र कोल्हे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, काही जण तुमच्या मनात विष टाकण्याचा प्रयत्न करतायत, पण तुम्ही विकासासाठी पुढे आले पाहिजे. महायुती मध्ये मुस्लिम कार्यकर्ते सन्मानाने काम करत असून, आमच्याकडे त्यांचा मान कसा राखला जातो हे त्यांना भेटून विचारा. शहरातील नाटकी नाल्याचे बंदिस्तीकरण व सुशोभीकरण, दीडशे दिवसांच्या महाप्रकल्पातील पहिल्या 30 दिवसांत प्रभागातील खड्डेमुक्ती, स्वच्छता आणि पाणीपुरवठा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन आमदार यांनी दिले. संगमनेर नगरपालिकेचे१२९ कोटींचे बजेट असून त्या बजेटमधून या प्रभागासाठी ते नऊ कोटीही देऊ शकले नाहीत, मग 40 वर्षे ज्यांच्या कडे सत्ता होती त्यांनी तुमचं नेमकं काय काम केले असाही आरोप आमदार खताळ यांनी केला मुस्लिम बहुल भागांत मुलांना खेळण्यासाठी एकही गार्डन उभारले गेले नाही. ज्यांना तुम्ही 40 वर्षे निवडून दिले, त्यांनी तुमचा विचारच केला नाही, अशी टीका त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या सह त्यांच्या मंत्र्यांकडे नगर विकास, गृहनिर्माण, पाणीपुरवठा, आरोग्य, यांसह सर्व महत्त्वाची खाते असल्याने सर्व प्रलंबित विषय लवकर निकाली काढण्याची हमी त्यांनी दिली. इस्लामपुरा भागाचे आरक्षण उठवून घरकुल देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. आमदार खताळ यांनी तरुणांसाठी एमआयडीसीत रोजगार निर्मिती, संगमनेरमध्ये आरटीओ कार्यालय, 100 खाटांचे कॉटेज हॉस्पिटलच्या जागेत महिला आणि बाल रुग्णालय सुरू करणार आहे तसेच स्वतंत्र फिश मार्केट, खाऊ गल्ली, सुरू करणार आहे तुमच्या प्रभागात संपूर्ण शहरात महिलांची दाग दागिने चोरी जात आहे त्यामुळे त्यांची सुरक्षिता अबाधित ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहे तसेच या भागात ड्रेनेज लाइन, पावसाचे पाणी व्यवस्थापन, उर्दू शाळांची सोय, चांगले शिक्षक मिळवून देणे अशा सुविधा लवकरच मिळतील असेही त्यांनी सांगितले.
