संगमनेरच्या कामगार रुग्णालयाची समस्या सोडविणार — मंत्री विखे पाटील

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

नागपूर हिवाळी अधिवेशनात विशेष बैठक घेवून कामगार रुग्णालयाची समस्या सोडविण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

मंत्री विखे पाटील यांनी मालपाणी उद्योग समूहातील अधिकारी आणि कामगाराची भेट घेवून त्यांना महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले. आमदार अमोल खताळ, राजेश मालपाणी, डाॅ. अशोक इथापे, कामगार नेते माधव नेहे, ज्ञानेश्वर सहाणे उमेदवार सुवर्णा खताळ आदी उपस्थित होते.

कामगार रूग्णालयाच्या मागणीचे निवेदन मंत्री विखे पाटील यांना दिले. या मागणीला गांभिर्याने मार्गी लावण्यासाठी मी व्यक्तिगत पाठपुरावा करण्यार असल्याचे त्यांनी सांगितले.

मालपाणी उद्योग समूहात आल्यानंतर आपल्या परीवारात आल्यासारखे वाटते.स्व.सहाणे मास्तर यांच्या माध्यमातून आपला स्नेह वाढला.स्व.ओंकारनाथ मालपाणी स्व.बाळासाहेब विखे या तिघांचा ॠणानुबंध सर्वश्रृत होता.त्यांच्या पश्चात राजेश मालपाणी संजय मालपाणी यांनी उद्योग समूहाची धुरा यशस्वीपणे पुढे घेवून जात असल्याबद्दल कौतुक केले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कामगारांसाठी अनेक योजना सुरू आहेत.लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले.पण सरकारची एकही योजना बंद झाली नाही. आयुष्मान भारत योजनेतून आरोग्य सुविधा बांधकाम कामगारांच्या कुटूबियांसाठी सरकार काम करीत असल्याचे सांगितले. नगरपालिकेत परिवर्तनासाठी साथ देण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले..

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!