संगमनेर शहराच्या विकासाला गती देऊ — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
शहराच्या विकासाला गती देवून आदर्श नगरपरीषद आपल्याला निर्माण करायची आहे. महायुती सरकार कुठल्याही विकास कामाला निधी कमी पडू देणार नाही ही माझी कमिटमेंट आहे. वर्षानूवर्षे फक्त स्वत::च्याच घरात पालिकेत सत्ता ठेवणाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशीही सरकार करणार असून, बंद पडलेले कॉटेज रुग्णालय, जल शुद्धीकरण प्रकल्प तसेच तरुणांच्या रोजगारांसाठी औद्योगीक वसाहतीची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि उपनगरातील जागांवरचे आरक्षण उठविण्यासाठी आमदार अमोल खताळ यांना महायूती सरकारचे संपूर्ण पाठबळ राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभेत दिली.

संगमनेर नगरपरीषद निवडणूकीत नगराध्यक्ष पदाकरीता निवडणूक रिंगणात असलेल्या महायुतीच्या उमेदवार सुवर्णा संदीप खताळ व अन्य ३० उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महायुतीची प्रचार सभा संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार अमोल खताळ, शेतकरी नेते संतोष रोहम, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे, तालुका अध्यक्ष रामभाऊ राहाणे, राजेंद्र सोनवणे, रमेश काळे, विनोद सूर्यवंशी, भाजप शहर अध्यक्षा पायल ताजणे, ॲड.श्रीराम गणपूले, आरपीआयचे आशीष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार यांचेसह सर्व प्रभागातील महायुतीचे उमेदवार उपस्थीत होते.

शिंदे म्हणाले की, विधानसभा निवडणूकीत तालुक्यातील मतदारांनी येथून काँग्रेस हद्दपार केली ती आता देशातही कुठे दिसत नाही. आता तर तूम्ही पंजाही नष्ट केला आहे. आता पंजा शोधण्यासाठी मेणबत्ती लावावी लागेल. ४० वर्षांची सत्ता थंड झाली आहे. तालुक्यात झालेले हे परीवर्तन आपल्याला आता विकास कामामध्ये परावर्तीत करायचे आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आमदार अमोल खताळ यांचे उत्तम काम सुरु आहे. नगरविकास खाते माझ्याकडे आहे त्यामुळे शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.

राज्य सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही असे आश्वासीत करुन उपमुख्य मंत्री शिंदे यांनी सांगितले की, संगमनेर शहरामध्ये महीला व बाल रुग्णालय तातडीने सुरु करण्या साठी सहकार्य करेल. यासाठी त्यांनी तातडीने राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क सांगून याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. या तालुक्यातील तरुणांच्या हातालाकाम देण्या लसाठी औद्योगिक. वसाहती च्या मागणीचा पाठपुरावा आमदार अमोल खताळ करीत असून, त्याला ही महायुती सरकार सर्वोतोपरी सहकार्य करेल. शहरातील नागरीकां वर लादण्यात आलेला शास्तीचा कर माफ करण्याबाबत, घरकूल योजना पूर्णत्वास नेण्यासाठी तसेच ड्रग्ज माफीयांची चौकशी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जागा कमी पडत आहे. यासाठी परिवहन मंत्री यांना सूचना देवून हे स्मारक कसे पूर्ण होईल यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगून एकनाथ शिंदे म्हणाले की, या शहराला विकासामध्ये आपल्याला प्रथम क्रमांकामध्ये आणायचे आहे. यासाठी तुम्हाला महायूतीच्या उमेदवारांना निवडून द्यावे लागेल.

डॉ.सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात या तालुक्यात अफवा पसरवून राजकारण करण्याची जुनी पद्धत असल्याचे सांगून, जे अफवा पसरवत आहे ते कुणीही आमच्याकडे येणार नाहीत. मागील आठ महिन्यांत महायुती सरकारने शहर आणि तालुक्यातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी निधीची उपलब्धता करुन दिली. ४० वर्षे जे प्रश्न सुटले नाहीत ते एका वर्षात मार्गी लागले आहेत. महायुतीची सत्ता नगरपालीकेत आली तर विकास प्रक्रीयेला अधिक गती मिळले असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात वर्षानुवर्षे एकाच कुटूंबात पालीकेची सत्ता राहिल्याने विकासकामांना गती मिळू शकली नाही. त्यामुळे विधानसभेतील परीवर्तनानंतर शहरातील जनतेने आता पालिकेत परीवर्तन घडविण्याचा निर्धार केला आहे. शहराच्या विकासासाठी दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करण्यास आम्ही कटीबद्ध असून आम्ही खोटी स्वप्न दाखवत नाही.विरोधकांचे खोटे व्हीजन जनतेने अनुभवले आहे. आमचा वचननामा हा सर्वसामान्यांच्या मनातील असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी जावेद जहागीरदार, श्रीराम गणपूले, संतोष रोहम, विठ्ठलराव घोरपडे, महायुतीच्या उमेदवार सुवर्णा खताळ यांची भाषणे झाली.
