सोनेवाडी येथील अवैध स्टोन क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर स्थगित

तालुक्यात वाढलेले अवैध धंदे तातडीने बंद करा — माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर प्रतिनिधी दिनांक 2 —

निमोण सोनेवाडी गावामध्ये अवैध स्टोन क्रेशरला परवानगी देण्यात येणार नाही असा ग्रामसभेमध्ये ठराव झालेला असताना काही लोकांनी राजकीय संधीचा फायदा घेऊन ग्रामसभेला काळीमा फासला व जनतेची फसवणूक केली याप्रकरणी मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या भागवत बाबुराव सांगळे व सहकाऱ्यांचे आमरण उपोषण माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर सुटली असून दोषींवर तातडीने कारवाई करा अशा सूचना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

संगमनेर पंचायत समिती येथे सोनवडी ग्रामसभेत झालेल्या ठरावा नंतरही जनतेची फसवणूक करून ग्रामसभेला काळिमा फासणाऱ्या सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावे या मागणी करतात भागवत बाबुराव सांगळे व इतर नागरिकांनी सात दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले होते. प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असताना लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण सुटले यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे. गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, श्रीकांत सांगळे प्रशांत सांगळे दिलीप बोंद्रे रामदास जायभाये सूर्यभान जायभये आदी नागरिक उपस्थित होते.

12 सप्टेंबर 2022 रोजी सोनेवाडी ग्रामसभेमध्ये ठराव करण्यात आला होता की गावामध्ये कोणत्याही स्टोन क्रेशरला परवानगी दिली जाणार नाही. यानंतर 27 मे 2025 रोजी पुन्हा ग्रामसभेमध्ये असाच निर्णय झाल्यानंतर सध्याचे सरपंच उपसरपंच व सदस्य आणि ग्रामसेवक यांनी खोटी मासिक मीटिंग दाखवून ग्रामसभेचा अपमान केला आहे. याबाबत कारवाई करावी व ग्रामपंचायत परिसरात स्टोन क्रेशरला दिलेली परवानगी नाकरावी याकरताही उपोषण सुरू होते. या रास्त मागणीकडे प्रशासनाची दुर्लक्ष केल्याने काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मध्यस्थी केल्यानंतर ग्रामस्थांनी हे उपोषण मागे घेतले.

 

थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्याची शांतता आणि सुव्यवस्था भंग करण्याचे काम काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत. शांत सुसंस्कृत असलेला तालुका आता अवैध धंद्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. चुकीच्या गोष्टी होणार नाही याची नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे याच प्रमाणे प्रशासनाने सुद्धा अत्यंत सतर्क राहून कोणत्याही चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालू नये अशा सूचना दिल्या आहेत.

तर उपोषणकर्ते भागवत बाबुराव सांगळे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत जबाबदारीने तालुका सांभाळला आहे. मात्र आता नवीन आलेल्या सत्ताधाऱ्यांमुळे अनेक लोक गावांमध्ये गुंडागर्दी करू पाहत आहे. दादागिरी वाढली आहे. हे यापूर्वी कधीही नव्हते.

सोनेवाडी ग्रामसभेच्या ठरावानुसार गावात या हद्दीतील स्टोन क्रेशरला कायमस्वरूपी परवानगी नाकारावी, अवैध क्रेशरचे परवानगी तातडीने रद्द करावे ही आमची मागणी आहे. मात्र महायुतीच्या सत्ताधाऱ्यांच्या नावाखाली गावांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्यांनी चुकीच्या गोष्टी सुरू केल्या असून या तातडीने थांबल्या पाहिजे अन्यथा आत्मदहनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!