संगमनेर गुळ भेसळ प्रकरण दाबले ! प्रांत कार्यालयासमोर उपोषण..!!

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारभारावर शंका… व्यापारी आणि अधिकाऱ्यांचे हितसंबंध असल्याचा आरोप…

संगमनेर प्रतिनिधी दिनांक 25 —

संगमनेर शहरात सिद्धी शुद्ध नैसर्गिक गुळ यामध्ये भेसळ असल्याची तक्रार काही महिन्यांपूर्वी शंकर ढमाले यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आहिल्या नगर कार्यालयाकडे केली होती. मात्र या विभागाकडून कुठलीही कारवाई न झाल्याने आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याने ढमाले यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून हे उपोषण दिनांक 28 ऑगस्ट 2025 पासून संगमनेर शहरातील प्रांत अधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात येणार आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, संगमनेर शहरातील सिद्धी शुद्ध नैसर्गिक गुळ या नावाने विकल्या जाणाऱ्या मोहनलाल बन्सीलाल दर्डा यांच्या गुळामध्ये भेसळ असल्याने दोन वेळा आजारी पडलो होतो. त्यानंतर मला त्रास होऊन रुग्णालयात ऍडमिट व्हावे लागले असल्याचे माझ्या लक्षात आले. म्हणून नगर येथील अन्न व

औषध प्रशासन विभागाकडे मी रीतसर तक्रार केली होती. तसेच भेसळ असल्याचा अहवाल देखील त्यांना सादर केला होता. मात्र सदर विभागाकडून संबंधित फर्मवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. उलट परस्पर गुळाचे नमुने घेऊन स्वतःच अधिकाऱ्यांनी फर्मला क्लीन चिट देऊन टाकली.

त्यामुळे या संदर्भाने सदर विभागाकडे मी माहिती अधिकारात माहिती दोन वेळा मागून देखील माहिती देण्याचे नाकारल्या मुळे मला वरिष्ठांकडे नाशिक येथे अपील करावे लागले. हा सर्व प्रकार पाहता माझी अशी खात्री झाली आहे की अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून संगमनेर येथील गुळ भेसळ प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे.

तसेच याआधी संगमनेर शहर व तालुक्यात अन्न भेसळीचे जे प्रकार झालेले आहेत त्या सात ते आठ प्रकरणांमध्ये तक्रारी करून देखील आणि भेसळ असल्याचे अहवाल येऊन देखील याच कार्यालयाकडून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित विभाग हा अन्न भेसळीला खतपाणी घालत असल्याचे माझे स्पष्ट मत झालेले आहे, आणि अशा भेसळयुक्त उत्पादनांच्या मालकांना पाठीशी घालत आहे. यामध्ये काहीतरी काळेबेरे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विभागाकडून मला न्याय मिळेल असे वाटत नसल्याने मी प्रशासनाकडे दाद मागण्यासाठी उपोषणास बसत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!