सकल मराठा समाजाच्या वतीने संगीता वानखेडे चा जाहीर निषेध !
वानखेडे वर संगमनेरात गुन्हा दाखल
संगमनेर प्रतिनिधी दिनांक —
सोशल मीडियाच्या माध्यमातून youtube वर कुणाच्यातरी सांगण्यावरून कुणाच्याही बद्दल अत्यंत वाईट आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या संगीता वानखेडे या महिलेविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठी संतापाची लाट निर्माण झाली असून अभद्र भाषा बोलणाऱ्या या महिलेवर कठोर कारवाई करा अशी मागणी संगमनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली असून वानखेडे चा तीव्र निषेध करण्यात आला आहे. दरम्यान संगमनेर शहर पोलिसांनी वानखेडे यांच्या विरोधात अर्धाकलपात्र गुन्हा दाखल केला आहे प्रकाश कडलग यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.

संगमनेर पोलीस स्टेशन येथे याबाबतचे निवेदन देण्यात आले यावेळी अर्चनाताई बालोडे, पद्मा थोरात, प्रमिला अभंग, शितल भुसाळ, अमृता राऊत, बेबीताई थोरात, सुनिता कांदळकर, मीना पटेल, सपना मंडलिक, छाया देशमुख, उज्वला गोडगे, मनीषा शिंदे, वैशाली बर्गे, सुरेश झावरे, तात्या कुटे, सत्यजित थोरात, सुरेश थोरात, सौरभ कोल्हे आदि मान्यवर उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, संगीता वानखेडे पैसे घेऊन कुणाही विषयी बदनामीकारक वक्तव्य करत आहेत. बोलणे अत्यंत अभद्र आणि बेताल आहे. यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. याचबरोबर महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. महिला असून महिलांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या वानखेडे बद्दल संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत रोष निर्माण झाला आहे.

मराठा समाज मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणासाठी आंदोलन करत असताना या समाजाविरुद्ध या बाईने अत्यंत खालच्या पातळीचे वक्तव्य केले. त्यामुळे संपूर्ण मराठा समाजात मोठा रोष निर्माण झाला असून मराठा समाजाबरोबर ओबीसी समाज यांनीही या बाई विरुद्ध तक्रारी केल्या आहेत. पैसे दिले की कुणाबद्दलही वाईट बोलणारी ही बाई महाराष्ट्राला कलंक असल्याची टीका तालुकाध्यक्ष अर्चनाताई बालोडे यांनी केली असून अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी उपस्थित सर्व महिला भगिनी व मराठा समाजाच्या नागरिकांनी केली आहे.

संगीता वानखेडेवर गुन्हा दाखल..
संगमनेर येथील रहिवासी प्रकाश कडलग यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून वानखेडे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, दिनांक 07.09.2025 रोजी सांयकाळी 07.00 वाजण्याचे दरम्यान मी माझे मोबाईल फोनमध्ये युट्युब बघत असताना स्पष्ट मत LIVE या चॅनलवर महिला नामे संगिता वानखेडे (रा. देव सिटी सहकारी गह रचना संस्था मर्यादित, सेक्टर नं 11, प्लट नं 145, मर्सडिज बेंज चौक, स्पाईन रोड, मोशी प्राधिकरण पुणे) हीने मराठा
समाजाचे वतीने आरक्षणासाठी मुंबई येथे काढण्यात आलेल्या मोर्चा विषयी मराठे आंदोलनात जातात आणि घरी बायको जवळ दुसरेच झोपुन जातात या अशा मराठा स्त्रियांची बदनामी करणारे अपशब्द बोलून त्याचा ऑडिओ व्हिडीओ टाकून तो व्हायरल करुन माझी तसेच सकल मराठा समाजाची जनमाणसात, समाजात बदनामी करुन मराठा समाजाच्या भावना दुखविल्या आहे. सदर बाबत आम्ही मराठा समाजाच्या वतीने सदर तक्रारी सोबत एकुण 17 तक्रारी अर्ज दिलेले आहे.
