एमआयडीसी परिसरात चालणाऱ्या 2 जुगार अड्डयांवर स्थानिक गुन्हे शाखेकडून छापे 

17 आरोपी ; 2 लाख 27 हजार 930 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर प्रतिनिधी दिनांक 12

स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) च्या पथकाने एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती काढून सहयाद्री चौक ते चाकण ऑईल मिल रोडलगत हॉटेल जनता दरबार पाठीमागील पटांगणात व वडगाव गुप्ता ते शेंडी जाणाऱ्या रोडलगत उघडमळा, वडगाव गुप्ता येथील शेतात अशा दोन ठिकाणी चालणाऱ्या जुगार अड्डयांवर छापे टाकून कारवाई केली. पथकाने केलेल्या कारवाईमध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशनला महाराष्ट्र जुगार कायदयान्वये 17 आरोपीविरूध्द दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून 2 लाख 27 हजार 930 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाव तपास पथकातील पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, संतोष खैरे, सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव, आकाश काळे, अमृत आढाव, जालींदर माने, विशाल तनपुरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

जुगार अड्ड्यांवरील छाप्यात खालील व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

अ.क्र. पो.स्टे. गुरनं व कलम जप्त मुद्देमाल आरोपी

1 एमआयडीसी गुरनं 388/25 महा. जुगार कायदा कलम 12 (अ) 39,880/- 1. किरण प्रभाकर पाटील, वय 52, रा. भिंगार

2. अविनाश माणिक भोसले, वय 37, रा.वामनभाऊनगर, पाथर्डी

3. एकनाथ केरू कोतकर, वय 40, रा.इसळक, ता.अहिल्यानगर

4. प्रदीप भाऊसाहेब कोहोक, वय 30, रा.दौलावडगाव, ता.आष्टी, जि.बीड

5. महेंद्र शिवराय कदम, वय 51, रा.नवनागापूर, ता.अहिल्यानगर

6. रविंद्र रावसाहेब साळवे, वय 36, रा.ब्राम्हणगल्ली, माळीवाडा, अहिल्यानगर 7.अनिल चंदु मके, वय 34, रा.निंबळक, ता.अहिल्यानगर

8. विशाल भाऊसाहेब पाटोळे, वय 23, रा.नागापूर, ता.अहिल्यानगर

9. निलेश भालचंद्र भाकरे, वय 41, रा.आंबेडकर चौक, नागापूर, अहिल्यानगर

2 एमआयडीसी गुरनं 389/25 महा. जुगार कायदा कलम 12 (अ) 1,88,050/-

1.चंद्रकांत बबन आंबेडकर, वय 50

2. राजेंद्र शिवराम कदम, वय 56

3. सावता आष्टीम चव्हाण, वय 33

4. भाऊसाहेब रामचंद्र वरूटे, वय 56

5. शंकर रामभाऊ धुमाळ, वय 62

6. नारायण धोंडीराम शिंदे, वय 63

7. भाऊराव लहाणु शिंदे, वय 68

8. हुसेन गुलाब सय्यद,वय 60 सर्व रा.वडगावगुप्ता, ता.अहिल्यानगर

सदर कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर व संपत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण उपविभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!