संगमनेरसह अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

  33 गुन्ह्यात 5 लाख 94 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर प्रतिनिधी दिनांक 14

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईची मोहीम उघडली आहे.

 

स्थानिक गुन्हे शाखाव तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप पवार, गणेश धोत्रे, अतुल लोटके, मयूर गायकवाड, आकाश काळे, शाहीद शेख, पंकज व्यवहारे, प्रमोद जाधव, अमृत आढाव, महादेव भांड, विश्वास बेरड, बिरप्पा करमल, बाळासाहेब नागरगोजे, भगवान थोरात, रोहित मिसाळ, ज्योती शिंदे, उमाकांत गावडे, हृदय घोडके, गणेश भिंगारदे, रविंद्र घुंगासे, जालींदर माने, रोहित येमुल, गणेश लोंढे, सोमनाथ झांबरे, रणजीत जाधव, रमीजराजा आत्तार, विशाल तनुपरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

संगमनेर, तोफखाना, एमआयडीसी, जामखेड, बेलवंडी, लोणी या पोलीस स्टेशन हद्दीत ही कारवाई करण्यात आली. पथकाने तोफखाना, एमआयडीसी, जामखेड, बेलवंडी, लोणी व संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व्यावसायिकांची माहिती काढून छापे टाकून अवैध दारू, जुगार व अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरूध्द कारवाई केली.

पथकाने केलेल्या कारवाईमध्ये खालील नमूद पोलीस स्टेशन मध्ये 33 गुन्हे दाखल करून त्यामध्ये 5,94,060/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

पोलीस स्टेशन कारवाईचा प्रकार दाखल गुन्हे जप्त मुद्देमाल

1 तोफखाना जुगार 6 जप्त मुद्देमाल 8,200/-

तोफखाना दारू 2 जप्त मुद्देमाल 8,390/-

2 एमआयडीसी दारू 6 जप्त मुद्देमाल 26,875/-

एमआयडीसी जुगार 1 जप्त मुद्देमाल 1,340/-

3 जामखेड दारू 8 जप्त मुद्देमाल 18,895/-

4 बेलवंडी दारू 4 जप्त मुद्देमाल 31,290/-

5 लोणी अवैध वाळु 1 जप्त मुद्देमाल 3,10,000/-

6 संगमनेर शहर जुगार 5 जप्त मुद्देमाल 1,89,070/-

* एकुण 33 जप्त मुद्देमाल 5,94,060/-

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!