स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई 

अहिल्या नगर जिल्ह्यात आठवड्यात अवैध जुगार दारूचे 112 गुन्हे दाखल 

आठ लाखांपेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 

संगमनेर प्रतिनिधी दि.8

अहिल्या नगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचा सपाटा स्थानिक गुन्हे शाखा एलसीबीने सुरू केला असून गेल्या आठवड्यात अवैध दारू आणि जुगार अड्डवर छापे टाकून तब्बल 112 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि आठ लाखांपेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटण करण्याचे दृष्टीने अवैध धंद्यांची माहिती घेऊन जास्तीत जास्त अवैध धंद्याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 1 मे त 7 मे दरम्यान ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्यात आली.

पथकाने अवैध दारू विक्री चालणाऱ्या 95 ठिकाणी छापे टाकून 6,50,255/- रुपये किंमतीची अवैध देशी, विदेशी दारु तसेच तयार गावठी हातभट्टी व कच्चे रसायन नाश करुन महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 प्रमाणे 95 गुन्हे खालीलप्रमाणे पोलीस स्टेशनला दाखल केले आहेत.

अवैध दारू कारवाई

अ.क्र. पोलीस स्टेशन दाखल जप्त मुद्देमाल

1 तोफखाना 7 केसेस 20900

2 एमआयडीसी 12 केसेस 50695

3 नगर तालुका 11 केसेस 244500

4 पारनेर 5 केसेस 17620

5 श्रीगोंदा 3 केसेस 10585

6 शेवगाव 8 केसेस 29370

7 नेवासा 12 केसेस 18650

8 पाथर्डी 4 केसेस 9510

9 श्रीरामपूर शहर 11 केसेस 114870

10 संगमनेर शहर 1 केसेस 4825

11 अकोले 4 केसेस 13830

12 राजूर 2 केसेस 4240

13 शिर्डी 15 केसेस 110660

* एकुण 95 केसेस 650255

तसेच जुगार, मटका, बिंगो चालणाऱ्या ठिकाणी छापे टाकून आरोपीविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे 17 गुन्हे दाखल करून आरोपीकडून 1,78,020/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.दाखल करण्यात आलेल्या गुन्हयांची माहिती खालीलप्रमाणे

मटका जुगार बिंगो अड्डे कारवाई

अ.क्र. पोलीस स्टेशन दाखल मुद्देमाल

1 नेवासा 3 केसेस 3130

2 एमआयडीसी 2 केसेस 38720

3 अकोले 4 केसेस 5740

4 शिर्डी 7 केसेस 109830

5 राहुरी 1 केसेस 20600

* एकुण 17 केसेस 178020

सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे (श्रीरामपूर) अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे (अहिल्यानगर) यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!