कत्तलीसाठी जाणारी 17 गोवंश जनावरे पकडली
14 लाखाचा मुद्देमाल हस्तगत
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 8
एका माल ट्रक मधून कत्तलीसाठी गोवंश जातीचे जनावरे चारा पाण्या वाचून दाटी-वाटीने नेत असल्याची माहिती घारगाव पोलिसांना मिळाल्यानंतर आंबी खालसा फाट्यावर पोलिसांनी त्या ट्रकला अडवून माहिती घेतली असता त्यामधून 17 जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचे उघड झाल्याने या ट्रक सह जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे 14 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गोवंश जातीचे जनावरे पुणे नाशिक महामार्गावरून एका ट्रक मधून नेली जाणार असल्याची माहिती घारगाव पोलिसांना समजली. बजरंग दलाचे कार्यकर्ते अमित विजय कुलकर्णी, ऋषी भोर व पोलिसांचे पथक पुणे नाशिक महामार्गावरील आंबीखालसा फाटा येथे थांबले असता रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घारगांवाच्या दिशने एम.एच.25 यु 1455 हा ट्रक येताना दिसला. ट्रक थांबवून ट्रकचीव झडती घेतल्यानंतर सदर ट्रक मध्ये गोवंश जातीची 17 जनावरे दाटीवाटीने चारा पाण्या विना बांधलेली मिळुन आली. ट्रक चालक व त्याचा जोडीदार यांना त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे 1) बबन बाबुराव लोंढे, वय 42 वर्षे रा. औसरी, मंचर, ता. आंबेगांव, जि. पुणे 2) दीन महंमद इनमादार वय 22 वर्षे रा. भैरवनाथ आळी, मंचर, ता. आंबेगांव, जि. पुणे असे असल्याचे सांगितले.

सदर ट्रक मधून पोलिसांनी
1) 4,25,000/- रु.किं.चे गोवंश जातीच्या मोठ्या 17 गायी प्रत्येकी 25,000/-रु.किं. प्रमाणे किं.अं.
2) 10,00,000/- रु. कि.चा. एक टाटा कंपनीचा ट्रक त्याचा नंबर एम.एच.25 यु 1455 असा असलेला जु.वा.कि.अं.
——————
14,25,000/- असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची गोवंश जनावरे हि मोहम्मदसाले खालीद बेपारी, (रा. आळे, ता. जुन्नर जि.पुणे) याचेकडुन भरली असुन ती जनावरे तौसीफ कुरेशी (रा. संगमनेर) याचेकडे कत्तली साठी खाली करणार असले बाबत सांगितले आहे. तरी गोवंश जनावरे पुढील संगोपना करिता गोरक्षन केंद्र सायखिंडी, ता.संगमनेर येथे पाठविण्यात आली आहेत.
घारगाव पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रमोद अशोक गाडेकर, सुभाष बोडखे, हवालदार दिवटे यांच्यासह पंचांनी ही कारवाई केली. प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
